"विकासाशी शत्रूसारखे का वागताय? का महाराष्ट्रद्रोह करताय?’’ उद्धव ठाकरेंना सवाल

By बाळकृष्ण परब | Published: December 19, 2020 11:34 AM2020-12-19T11:34:18+5:302020-12-19T11:34:55+5:30

Mumbai Politics : कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनचे नियोजित स्टेशन असलेल्या ठिकाणी हलवण्याची तयारी ठाकरे सरकारने केली आहे.

"Why do you treat development like an enemy? Why are you betraying Maharashtra? '' Uddhav Thackeray asked | "विकासाशी शत्रूसारखे का वागताय? का महाराष्ट्रद्रोह करताय?’’ उद्धव ठाकरेंना सवाल

"विकासाशी शत्रूसारखे का वागताय? का महाराष्ट्रद्रोह करताय?’’ उद्धव ठाकरेंना सवाल

Next

मुंबई - कांजूरमार्ग येथील मेट्रो कारशेड प्रकल्प न्यायालयीन लढाईत अडकण्याची चिन्हे निर्माण झाल्याने आता ही कारशेड बीकेसीमध्ये बुलेट ट्रेनचे नियोजित स्टेशन असलेल्या ठिकाणी हलवण्याची तयारी ठाकरे सरकारने केली आहे. दरम्यान, ठाकरे सरकारकडून उचलण्यात येत असलेल्या पावलांवर भाजपा नेते आशिष शेलार यांनी सडकून टीका केली आहे. विकास योजनांसोबत शत्रूसारखे का वागताय, का महाराष्ट्रद्रोह करताय, अशी विचारणा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारकडे केली आहे.

आशिष शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर गेले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजना नुसार बीकेसील भूखंडावर भूभागात बुलेट ट्रेनचे स्टेशन तर पृष्ठभागावर आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र अशी आखणी करण्यात आली. मात्र आता विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या अहंकारी नियोजनातून बीकेसीत जर मेट्रो कारशेड होणार असेल तर बुलेट ट्रेन होणार नाही आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर जाईल. असे करून का विकासाशी शत्रू सारखे वागताय? का महाराष्ट्र द्रोह करताय? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. 



आपल्या पुढच्या ट्विटमध्ये आशिष शेलार म्हणाले की, बुलेट ट्रेन नकोच म्हणताय. मेट्रो होऊच नये, अशी व्यवस्था करताय आणि बेस्टचे खाजगीकरण करुन मुंबईकरांची महत्त्वाची व्यवस्था मोडित काढताय...? मुंबईकरांनो ठाकरे सरकारच्या या तीन तिघाड्यामुळे मुंबईकरांना भविष्यात प्रवासासाठी वातानुकूलित बैलगाडा मिळणार आहे. 

Web Title: "Why do you treat development like an enemy? Why are you betraying Maharashtra? '' Uddhav Thackeray asked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.