हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही; ममता आक्रमक, भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 05:38 AM2021-04-01T05:38:09+5:302021-04-01T05:38:44+5:30

West Bengal Assembly Elections 2021 : पश्चिम बंगालमधील निवडणुकीमुळे वातावरण तापले असून दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला आक्रमक झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले.

West Bengal Assembly Elections 2021 : Will not leave the attackers; Mamata Aggressive, BJP's complaint to Election Commission | हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही; ममता आक्रमक, भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही; ममता आक्रमक, भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Next

गोघाट/कोलकाता : पश्चिम बंगालमधील निवडणुकीमुळे वातावरण तापले असून दुसऱ्या टप्प्याच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला आक्रमक झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले. नंदीग्राममध्ये माझ्या कारवर हल्ला करणाऱ्यांचे फोटो व व्हिडीओ माझ्याकडे आहेत. निवडणूक झाल्यानंतर त्या लोकांना सोडणार नाही व त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच ममता यांनी दिला आहे. प्रचार सभेदरम्यान त्या बोलत होत्या. (Will not leave the attackers; Mamata Aggressive, BJP's complaint to Election Commission)

माझ्या कारवर हल्ला करण्याची त्यांची हिंमतच कशी झाली. सध्या आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे मी शांत आहे. निवडणूक नसती तर त्यांनी किती मोठी चूक केली आहे, हे त्यांना सांगितले असते. निवडणूक झाल्यावर त्यांना सोडणार नाही, असे ममता म्हणाल्या. शुभेंदु अधिकारी यांचे नाव न घेता कोणता गद्दार तुम्हाला वाचवतो, हे मी पाहते. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश कुठेही गेला तरी मी तुम्हाला खेचून आणील, या शब्दात ममता यांनी हल्लेखोरांना इशारा दिला.  भाजपने ममता यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. ममता प्रचार सभांदरम्यान भाजपच्या समर्थकांना धमकी देत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. 

ममता बॅनर्जींचे भाजपेतर पक्षांच्या प्रमुखांना पत्र 
मुख्यमंत्री ममता बॅनर्जीं यांनी देशातल्या भाजपेतर पक्षांच्या प्रमुखांना पत्र लिहिलं आहे. भाजप सरकारच्या लोकविरोधी धोरणांविरोधात एकजुटीनं उभं राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपल्याला सोबत येऊन भाजपचा मुकाबला करायला हवा, असं आवाहन बॅनर्जी यांनी केले आहे. 
त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह एम. के. स्टॅलिन, अखिलेश यादव, हेमंत सोरेन, अरविंद केजरीवाल आदींना पत्र लिहिले. 

३० मतदारसंघांत आज होणार मतदान 

नंदीग्राम : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान गुरुवारी होणार आहे. या टप्प्यात उभे असलेल्या १७१ उमेदवारांपैकी २५ टक्के उमेदवारांविरोधात गुन्हेगारी खटले सुरू आहेत. मागील काही दिवसांतील हिंसाचाराच्या घटना लक्षात घेता संपूर्ण भागात कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. विशेषत: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नंदीग्राममधून निवडणूक लढत असून, त्यांच्यासमोर भाजपचे शुभेंदु अधिकारी यांचे मोठे आव्हान आहे. 
दुसऱ्या टप्प्यात पूर्व मेदिनीपूर, पश्चिम मेदिनीपूर, बांकुरा व दक्षिण २४ परगणा या जिल्ह्यांमधील ३० जागांवर निवडणूक होणार आहे. एकूण उमेदवारांपैकी केवळ ११ टक्के उमेदवार महिला आहेत. या टप्प्यात तृणमूल काँग्रेस व भाजपमध्येच प्रमुख लढत असल्याचे मानले जात आहे.  दोन्ही पक्षांतील दिग्गज नेत्यांनी प्रचारासाठी कंबर कसली होती.

हिंसाचार टाळण्याचे आव्हान
नंदीग्राम व आजूबाजूच्या भागात निवडणूक हिंसाचाराचा इतिहास राहिला आहे. प्रचारादरम्यानदेखील येथे हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे येथे हिंसाचार टाळण्याचे मोठे आव्हान सुरक्षायंत्रणेसमोर राहणार आहे. सीएपीएफच्या ६९७ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.


अशी आहे उमेदवारांची संपत्ती
- २६ (१५ टक्के) उमेदवार कोट्यधीश (भाजप - ३३ टक्के, तृणमूल - ३७ टक्के, काँग्रेस - २२ टक्के)


उमेदवारांचे शिक्षण 
शिक्षण - उमेदवारांची टक्केवारी
दहावीपर्यंत - ३७ टक्के
पदवी व पदव्युत्तर - ५९ टक्के 
पदविका - २ टक्के 
 
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार
n    १७१ पैकी ४३ (२५ %) उमेदवारांविरोधात फौजदारी खटले सुरू (भाजप - ५७ %, 
तृणमूल - २७%, भाकपा - ५०%, 
माकपा - ४७%, बसपा - २७%, काँग्रेस - २२%)
n    ३५ (२१%) उमेदवारांविरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे (भाजप - ५३%, तृणमूल - १७%, 
माकपा - ४०%, बसपा - २९%, काँग्रेस - २२%) 

असा आहे दुसरा टप्पा
एकूण जागा - ३०
मतदार - ७५,९४,५४९
एकूण मतदान
केंद्रे - १०,६२०
उमेदवार - १७१
 

Web Title: West Bengal Assembly Elections 2021 : Will not leave the attackers; Mamata Aggressive, BJP's complaint to Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.