तेव्हा पंतप्रधान मोदींच्या कानात काय सांगितले, अखेर त्या युवकाने गुपित उघड केले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 01:47 PM2021-04-07T13:47:45+5:302021-04-07T13:47:58+5:30

West Bengal Assembly Elections 2021 : ममतांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून बंगाल काबीज करण्यासाठी कंबर कसणाऱ्या भाजपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही जोरदार प्रचारसभा घेत आहेत. या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींचा एक फोटो व्हायरल झाला होता.

West Bengal Assembly Elections 2021 : What the said in Prime Minister Narendra Modi's ear, the young man Zulfiqar Ali finally revealed the secret | तेव्हा पंतप्रधान मोदींच्या कानात काय सांगितले, अखेर त्या युवकाने गुपित उघड केले

तेव्हा पंतप्रधान मोदींच्या कानात काय सांगितले, अखेर त्या युवकाने गुपित उघड केले

Next

कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीचा (West Bengal Assembly Elections 2021 ) प्रचार सध्या जोरात सुरू आहे. ममतांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावून बंगाल काबीज करण्यासाठी कंबर कसणाऱ्या भाजपासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीही (Narendra Modi) जोरदार प्रचारसभा घेत आहेत. या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींचा एक फोटो व्हायरल झाला होता. यामध्ये मोदी एका युवकाच्या खांद्यावर हात ठेवून त्याच्यासोबत बोलताना दिसत होते. दरम्यान, आता या फोटोतील तरुणाने समोर येत त्यावेळी पंतप्रधानांना नेमकं काय सांगितलं याचं गुपित उघड केलं आहे. (What the said in  Prime Minister Narendra Modi's ear, the young man Zulfiqar Ali finally revealed the secret)

३ एप्रिल रोजी सोनारपूर येथे मोदींची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी झुल्फिकार हा तरुण रॅलीत सहभागी होण्यासाठी आला होता. त्याने नमाजी टोपी परिधान केली होती. त्यावेळी मोदींनी त्याची भेट घेत विचारपूस केली होती. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत त्या भेटीबाबत माहिती देताना झुल्फिकार म्हणाला, तीन एप्रिलला आयोजित करण्याल आलेल्या सभेला जाण्याची माझी इच्छा नव्हती. त्यापूर्वी ब्रिगेडच्या कार्यक्रमाला गेलो असताना पार्किंगची जबाबदारी माझ्यावर होती. मी तिथपर्यंत पोहोचेन असा विचार मी स्वप्नातही केला नव्हता. पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकदा पाहावे आणि लांबून नमस्कार करावा, अशी माझी इच्छा होती. मी मोदींना खूप फॉलो करतो.  

त्या दिवशी पंतप्रधान मोदी गाडीमधून येत होते. सर्वजण त्यांना हात जोडून नमस्कार करत होते. पंतप्रधान मोदींनीही त्याच अंदाजात नमस्कार केला. त्यानंतर ते गाडीतून उतरले. त्यांनी माझे नाव विचारले. मी सांगितलं माझं नाव झुल्फिकार अली. हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे त्यांना ते ऐकू आले नाही. त्यानंतर ते जवळ आले. मी त्यांना माझं नाव सांगितलं. मग त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून विचारले की, तुला काय बनायचं आहे. तेव्हा मी त्यांना सांगितले की, मला नगरसेवक, आमदार, खासदार बनायचे नाही तर मी राष्ट्रहितामध्ये काम करू इच्छितो. 

यावेळी आपल्या भागाचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा होत असल्याबद्दल त्याने नाराजी व्यक्त केली. मंत्री फिरहाद हकीमसुद्धा या भागाला मिनी पाकिस्तान म्हणतात. पण आमच्यासारखे भारतीय जोपर्यंत आहेत, तोपर्यंत या भागाला पाकिस्तान आणि बांगलादेश बनू देणार नाही. जे लोक देशहिताबद्दल, कुटुंबाबद्लल आणि देशाचा विचार करतात, ते या भागाला पाकिस्तान, बांगलादेश बनू देणार नाहीत असेही त्याने यावेळी ठणकावून सांगितले. 
 

Web Title: West Bengal Assembly Elections 2021 : What the said in Prime Minister Narendra Modi's ear, the young man Zulfiqar Ali finally revealed the secret

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.