...ही तर भाजपच्या पुढाऱ्यांची राजकीय विचारांची दिवाळखोरी; उदय सामंतांची लाड यांच्या 'त्या' विधानावरुन जोरदार टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 12:09 AM2021-08-01T00:09:48+5:302021-08-01T00:10:54+5:30

शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपच्या काही पुढाऱ्यांच्या राजकीय विचारांच्या दिवाळखोरीच उत्तर महाराष्ट्रातील जनता  नक्की निवडणुकीत भाजपला  भुईसपाट करून देईल

Uday Samant replay on BJP MLA prasad lad statement about Shiv Sena Bhavan | ...ही तर भाजपच्या पुढाऱ्यांची राजकीय विचारांची दिवाळखोरी; उदय सामंतांची लाड यांच्या 'त्या' विधानावरुन जोरदार टीका

...ही तर भाजपच्या पुढाऱ्यांची राजकीय विचारांची दिवाळखोरी; उदय सामंतांची लाड यांच्या 'त्या' विधानावरुन जोरदार टीका

Next

सावंतवाडी :

शिवसेना भवन फोडू म्हणणाऱ्या भाजपच्या काही पुढाऱ्यांच्या राजकीय विचारांच्या दिवाळखोरीच उत्तर महाराष्ट्रातील जनता  नक्की निवडणुकीत भाजपला  भुईसपाट करून देईल... वंदनीय बाळासाहेबांचं शिवसेना भवन हे महाराष्ट्रासाठी भूषण असल्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे याबाबत स्वता प्रतिकिया व्यक्त केली आहे.भाजप नेते प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडू असे वक्तव्य केले त्यावर सामंत या प्रतिकिया दिली आहे.

काय म्हणाले भाजप आमदार प्रसाद लाड?
वेळ आली तर मुंबईतील शिवसेना भवन फोडू असं वादग्रस्त विधान भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी केलं आहे. ते मुंबईत दादर येथे भाजपा कार्यालयाच्या उदघटनावेळी बोलत होते. यावेळी आमदार नितेश राणे देखील उपस्थित होते. 

"नारायण राणेंना स्वाभीमानचा खूप मोठा गट आज राणेंमुळे भारतीय जनता पक्षात आला आहे. त्यामुळे भाजपाची ताकद निश्चितपणे दुप्पट झाली आहे. पुढच्या वेळी आपण जरा कार्यकर्ते कमीच आणू, कारण आपण आलो की पोलिसच खूप येतात. फक्त त्यांना सांगूयात गणवेशात येऊ नका, म्हणजे आपल्या हॉलमध्ये बसायला त्यांचा उपयोग होईल. एवढी भीती यांना वाटू लागलीय की माहिममध्ये आपण आता आलोय म्हणजे सेना भवन फोडणार की काय असं यांना वाटतं. काही घाबरू नका, वेळ आली तर ते देखील करू", असं चिथावणीखोर वक्तव्य प्रसाद लाड यांनी केलं आहे. यासोबतच सेनेच्या सर्व कुंडल्या आमच्याजवळ आहेत त्यामुळे दक्षिण मुंबईत कोणताही मोर्चा असेल तर तिथे आम्ही येणार आहोत आणि मोर्चाला आम्ही आल्यावर तिथं कुणी थांबणार देखील नाही, असंही ते पुढे म्हणाले. 

 

Web Title: Uday Samant replay on BJP MLA prasad lad statement about Shiv Sena Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.