'एका तासापेक्षा जास्त प्रचार ममता बॅनर्जींसाठीही करणार नाही'; नुसरत जहाँ यांचा व्हिडीओ शेअर करत भाजपनं घेतली फिरकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 12:28 PM2021-03-29T12:28:07+5:302021-03-29T12:30:01+5:30

West Bengal Election 2021 : पश्चिम बंगाल निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पडलं पार, भाजपनं तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचा व्हिडीओ शेअर करत डिवचलं.

TMC MP Nusrat Jahan Loses Temper At Election Rally Says Cant Do This Even For mamata banerjee | 'एका तासापेक्षा जास्त प्रचार ममता बॅनर्जींसाठीही करणार नाही'; नुसरत जहाँ यांचा व्हिडीओ शेअर करत भाजपनं घेतली फिरकी

'एका तासापेक्षा जास्त प्रचार ममता बॅनर्जींसाठीही करणार नाही'; नुसरत जहाँ यांचा व्हिडीओ शेअर करत भाजपनं घेतली फिरकी

Next
ठळक मुद्देपश्चिम बंगाल निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पडलं पारभाजपनं तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचा व्हिडीओ शेअर करत डिवचलं.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पार पडलं. तृणमूल काँग्रेस आपला गड राखण्याच्या प्रयत्नात आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपही आपली ताकद वाढवू पाहत आहे. अशातच दोन्ही पक्षांकडून एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडण्यात येत नाही. भाजपनं तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँ यांची फिरकी घेतली आहे. भाजपनं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच यात त्यांना आपला राग आवरला जात नसल्याचंही दिसून येत आहे. एका तासापेक्षा जास्त प्रचार तर मी ममता बॅनर्जींसाठीही करत नाही, असं म्हणतानाचा एक व्हिडीओ भाजपनं शेअर केला आहे. 

लवकरच पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडणार आहे. यासाठी नुसरत जहाँ या एक रोड शो करत होत्या. "मी एका तासापेक्षा जास्त कालावधीपासून प्रचार करत आहे. इतका तर मी ममता बॅनर्जींसाठीही करत नाही," असं त्या या रोड शोदरम्यान व्हिडीओत बोलताना दिसत आहे. यानंतर त्या गाडीतूनही खाली उतरल्याचं दिसत आहे.



भाजप बंगालनं त्यांचा हा व्हिडीओ शेअर करत फिरकी घेतली आहे. "नुसरत जहाँ टीएमसी खासदार, मी एका तासापेक्षा जास्त प्रचार करू शकत नाही, इतकं तर मी ममता बॅनर्जींसाठीही करणार नाही," असं त्यांनी या व्हिडीओसह लिहिलं आहे. ममता बॅनर्जींची टक्कर यावेळी त्यांच्याच पक्षातून भाजपमध्ये सामील झालेल्या सुवेंदू अधिकारी यांच्याशी होणार आहे. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान २७ मार्च रोजी पार पडलं. दुसऱ्या टप्प्याचं मतदान १ एप्रिल रोजी पार पडेल. 

Web Title: TMC MP Nusrat Jahan Loses Temper At Election Rally Says Cant Do This Even For mamata banerjee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.