"...तर कार्यालय पेटून देऊ", वीज वितरण कंपनीला मनसेने दिला दम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 05:32 PM2021-03-15T17:32:32+5:302021-03-15T17:33:37+5:30

MNS Warn power distribution company in Kalyan : वीज पुरवठा खंडीत कारवाईच्या विरोधात मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज कल्याण टाटा नाका येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन अधिका-यांच्या केबीनमधील वीज गुल केली.

"... then let's burn the office", MNS Warn power distribution company | "...तर कार्यालय पेटून देऊ", वीज वितरण कंपनीला मनसेने दिला दम

"...तर कार्यालय पेटून देऊ", वीज वितरण कंपनीला मनसेने दिला दम

googlenewsNext

कल्याण -वा ढीव वीज बिले पाठवून ती भरली गेली नसल्याने वीज वितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई सुरु आहे. या कारवाईच्या विरोधात मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज कल्याण टाटा नाका येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेऊन अधिका-यांच्या केबीनमधील वीज गुल केली. त्यांना मेणबत्ती भेट दिली. वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई थांबविली नाही तर यापूढे कार्यालय पेटून दिले जाईल असा सज्जड इशारा दिला आहे.

वीज वितरण कंपनीकडून लॉकडाऊनच्या काळात वाढीव वीज बिले पाठविण्यात आाली होती. लॉकडाऊनमध्ये लोक घरी होते. त्यांच्या हाताला काम नव्हते. तसेच काहींची पगार कपात करण्यात आली होती. आर्थिक संकटात सापडेल्या नागरीकाला दिलासा देण्याऐवजी वीज वितरण कंपनीने वाढीव वीज बिलाचा शॉक दिला. वाढीव वीज बिलाच्या विरोधात मनसे, शिवसेना आणि भाजपने वेळोवेळी आंदोलने केली. दरम्यान अर्थ संकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी वाढीव वीज बिल प्रकरणी वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार नाही असे आश्वासन दिले होते. वीज वितरण कंपनीकडून वाढीव बील भरावे लागेल यासाठी वीज ग्राहकांना सक्ती केली जात आहे. वीज बिल न भरलेल्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. 
 

उन्हाळा वाढला आहे. उन्हाने काहिली होत असताना वीज पुरवठा खंडीत केल्यावर घरातील विद्यार्थी ऑनलाईन अभ्यास कसा करणार, घरातील लहान मुले, वृद्ध कसे काय तोंड देणार अशा विविध समस्या आहे. ही परिस्थिती लक्षात घेता मनसेचे पदाधिरी योगेश गव्हाणो, अनंता गायकवाड, निर्मल निगडे, महेंद्र कुंदे यांनी टाटा नाका येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात धाव घेतली. त्याठिकाणी अधिका:यांच्या केबीनमधील  बत्ती कार्यकत्र्यानी गुल केली. विना पंखा, लाईट काम कसे करता, घामाच्या धारा कशा निघतात याची प्रचिती यावेळी अधिकारी वर्गास मनसेने करुन दिली. जवळपास पाऊण तास मनसेचे पदाधिकारी केबीनमध्ये चर्चा करीत होते. यावेळी अधिकाऱ्यांना मेणबत्ती भेट दिली. आत्ता मेणबत्ती भेट दिली आहे. वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई थांबविली नाही तर कार्यालय पेटून देऊ असा दम भरला आहे.

Web Title: "... then let's burn the office", MNS Warn power distribution company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.