"ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले, आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले’’

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 12:44 PM2021-04-07T12:44:23+5:302021-04-07T13:02:20+5:30

Coronavirus in Maharashtra : कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपामुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याठी राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत.

"Thakur Criticize Thackeray, rents out his own government with statistics" - Atul Bhatkhalkar | "ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले, आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले’’

"ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले, आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले’’

Next

मुंबई - कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकोपामुळे राज्यात (Coronavirus in Maharashtra) चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्याठी राज्य सरकारकडून कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. दरम्यान, या कठोर निर्बंधावरून विरोधी पक्ष आणि व्यापारी आवाज उठवत आहेत. दरम्यान, अमरावतीमध्ये (Amravati) कोरोनाला रोखण्यासाठी लावण्यात आलेले निर्बंध शिथिल करण्यासाठी राज्य सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी पत्र लिहिले आहे. दरम्यान, या पत्राचा आधार घेत भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ( Atul Bhatkhalkar Says, "Thakur Criticize Thackeray, rents out his own government with statistics")

अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणतात. ठाकूर यांनी ठाकरेंना हाणले. ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्री यशोमती ठाकूर यांनी आकडेवारीनिशी आपल्याच सरकारचे वाभाडे काढले आहेत. कोणताही अभ्यास न करता सरसकट लॉकडाऊन कसा अन्यायाने लादला आहे, हे दर्शविणारे  यशोमती ठाकूर यांचे पत्र म्हणजे ठाकरे सरकारला घरातून मिळालेली सणसणीत चपराक आहे, असा टोला भातखळकर यांनी लगावला आहे.

यशोमती ठाकूर यांनी लॉकडाऊन शिथिल करण्यासाठी लिहिलेल्या पत्रात जिल्ह्यातील गेल्या दोन महिन्यातील कोरोना रुग्णांची आणि पॉझिटिव्हिटी रेटची आकडेवारी दिली आहे. सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणात होत असलेली रुग्णवाढ आता नियंत्रणात आली आहे. त्यामुळे आता कोरोनाला रोखण्यासाठी लागू करण्यात आलेले निर्बंध आता शिथिल करावेत, असे यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे. त्याचाच आधार घेत भाजपाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे. 

Web Title: "Thakur Criticize Thackeray, rents out his own government with statistics" - Atul Bhatkhalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.