बिहारमध्ये तेजस्वी विरुद्ध तेजप्रताप संघर्ष तीव्र, लालू यादव कुणाच्या बाजूने? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2021 11:46 AM2021-08-20T11:46:45+5:302021-08-20T11:49:20+5:30

Bihar Politics News: बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.

Tejashwi vs Tej Pratap struggle intensifies in Bihar, Lalu Yadav on whose side? Find out ... | बिहारमध्ये तेजस्वी विरुद्ध तेजप्रताप संघर्ष तीव्र, लालू यादव कुणाच्या बाजूने? जाणून घ्या...

बिहारमध्ये तेजस्वी विरुद्ध तेजप्रताप संघर्ष तीव्र, लालू यादव कुणाच्या बाजूने? जाणून घ्या...

Next

पाटणा - बिहारमध्येराष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे दोन्ही पुत्र तेजस्वी यादव आणि तेजप्रताप यादव यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे.  (Bihar Politics) राजदचे बिहारमधील प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह यांनी त्यांच्यावर हिटलरशाहीचा आरोप करणारे तेजप्रताप यादव यांचे निकटवर्तीय आकाश यादव यांना राजदच्या विद्यार्थी अध्यक्षपदावरून हटवल्याने वाद अधिकच वाढला आहे.  तेजप्रताप यादव यांच्याबातत ते कोण आहेत. मी लालू प्रसाद यादव यांच्याप्रति उत्तरदायी आहे, असे विधान जगदानंद सिंह केले आहे. राजदचे बिहारमधील प्रदेशाध्यक्ष जगदानंद सिंह हे कार्यालयात पुन्हा बसू लागले आहेत. तसेच त्यांनी त्यांच्यावर हिटलरशाहीचा आरोप करणारे तेजप्रताप यादव यांचे निकटवर्तीय आकाश यादव यांना राजदच्या विद्यार्थी अध्यक्षपदावरून हटवत वाद अधिकच वाढवला आहे. (Tejaswap vs Tejaswap struggle intensifies in Bihar)

दरम्यान, जगदानंद सिंह यांच्या नाराजीचा अंदाज घेऊन लालू प्रसाद यादव यांनी त्यांनी पूर्ण मोकळीक दिली आहे. तेजप्रताप यादव यांनी त्यांच्या विधानांमुळे ज्याप्रकारे रघुवंश प्रसाद सिंह ज्याप्रकारे अपमानित केले होते. तशी वेळ पुन्हा येऊ नये, यासाठी लालू प्रसाद यादव सावधपणे पावले ऊचलत आहेत.

आता तेजप्रताप यादव यांनी याबाबत नाराजी व्यक्त करताना ट्विट केले आहे. सल्लागारांकडून सल्ला घेताना अध्यक्ष हे विसरले की, पक्ष घटनेनुसार चालतो. राजदची घटना सांगते की, नोटिस दिल्याशिवाय तुम्ही पक्षाच्या कुठल्याही पदाधिकाऱ्याला पदमुक्त करू शकत नाही. आज जे काही झाले ते राजदच्या घटनेविरोधात झाले आहे, असे तेजप्रताप यांनी म्हटले आहे.

दुसरीकडे आकाश यादव प्रकरणामध्ये बिहारचे विरोधीपक्षनेते आणि राजदचे ने तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया देताना पक्षामध्ये सुरू असलेला हा विवाद लवकरच संपुष्टात येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी तेजप्रताप यांच्याबाबत नाराजी आहे का असे विचारले असता ते म्हणाले की, आम्ही असताना तुम्ही का चिंता करत आहात. आम्ही आहोत. राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यामुळे सारे काही सुरळीत होईल.

तेजप्रताप यादव यांचे निकटवर्तीय आकाश यादव यांना बिहार विद्यार्थी राजदच्या अध्यक्षपदावरून हटवल्यानंतर त्यांच्या जागी गगन कुमार यांना अध्यक्ष बनवण्यात आले आहे. त्यावरून तेजप्रताप यादव नाराज झाले असून, त्यांनी याचा निषेध केला आहे.  

Web Title: Tejashwi vs Tej Pratap struggle intensifies in Bihar, Lalu Yadav on whose side? Find out ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.