राहुल गांधींनी भाजपविरुद्ध तमिळनाडू पॅटर्न राबवावा, स्टॅलिन यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 05:20 AM2021-03-30T05:20:31+5:302021-03-30T05:22:17+5:30

Tamil Nadu Assembly Elections 2021 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपविरोधात तमिळनाडू पॅटर्न राबवावा, असे  द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले आहे.

Tamil Nadu Assembly Elections 2021 : Rahul Gandhi should implement Tamil Nadu pattern against BJP, Stalin's advice | राहुल गांधींनी भाजपविरुद्ध तमिळनाडू पॅटर्न राबवावा, स्टॅलिन यांचा सल्ला

राहुल गांधींनी भाजपविरुद्ध तमिळनाडू पॅटर्न राबवावा, स्टॅलिन यांचा सल्ला

Next

सलेम (तामिळनाडू) : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपविरोधात तमिळनाडू पॅटर्न राबवावा, असे  द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले आहे. (Tamil Nadu Assembly Elections 2021) तमिळनाडूसारखी भाजपविराेधी युती काँग्रेसने राष्ट्रीय स्तरावर तयार करण्याची जबाबदारी राहुल गांधी यांनी घ्यावी, असे ते म्हणाले. येथे ६ एप्रिल रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी प्रचारसभेत बोलताना स्टॅलिन यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. सांप्रदायिक आणि फासीवादीच्या जोरावर भारताचा जीव घुटमळत आहे. यामध्ये राहुल गांधी यांच्यावर देशाला वाचविण्याची मोठी जबाबदारी आहे. ( Rahul Gandhi should implement Tamil Nadu pattern against BJP, Stalin's advice)

येथे निवडणुकीच्या प्रचारातील पहिलीच सभा हाेती. द्रमुकच्या नेतृत्वाखालील धर्मनिरपेक्ष प्रगतिशील युतीतील सर्व घटक पक्ष सहभागी झाले होेते. यामध्ये राहुल गांधीही सहभागी आहेत.

दुसरीकडे सत्तारूढ अण्णा द्रमुक, भाजप, पीएमके, माजी केंद्रीय मंत्री जी.के. वासन यांची तमिळ मनीला काँग्रेस (मूपानार) सह अन्य लहान पक्षांसह आघाडी करून निवडणूक लढवत आहेत. स्टॅलिन म्हणाले, भाजपने २०१९च्या लोकसभा निवडणुकीत तमिळनाडूमधून एकही जागा जिंकली नाही. कारण द्रमुकच्या नेतृत्वाखाली सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र आले होते. या निवडणुकीतही आमच्या आघाडीकडून भाजपचा दारुण पराभव होईल, असे स्टॅलिन म्हणाले.  ते म्हणाले, २०१९च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ ३७ टक्के मते मिळाली हाेती. यावरून ६३ टक्के लोकांनी भाजपच्या विरोधात इतर पक्षांना मतदान केल्याचे स्पष्ट होते. या निवडणुकीत भगवा पक्षाच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर कोणतीही आघाडी नव्हती. त्यामुळे राहुल गांधी यांनीही भाजपविरोधी राष्ट्रीय स्तरावर आघाडी करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. त्यांनी देशभरात यासाठी तत्काळ दौरे केले पाहिजेत. राहुल गांधी यांनी सर म्हणू नका, असे सांगितले असल्याचेही स्टॅलिन यांनी सभेत सांगितले. 

Web Title: Tamil Nadu Assembly Elections 2021 : Rahul Gandhi should implement Tamil Nadu pattern against BJP, Stalin's advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.