गृहमंत्री बदलण्यााबाबत जयंत पाटील यांनी दिले असे संकेत दिले, अनिल देशुमखांबाबत म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 04:26 PM2021-03-15T16:26:32+5:302021-03-15T16:32:40+5:30

Home Minister and Mumbai Police Commissioner will change : सचिन वाझे प्रकरणात सरकारसमोरील वाढत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री बदलले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

State Home Minister and Mumbai Police Commissioner will not change, informed Jayant Patil | गृहमंत्री बदलण्यााबाबत जयंत पाटील यांनी दिले असे संकेत दिले, अनिल देशुमखांबाबत म्हणाले...

गृहमंत्री बदलण्यााबाबत जयंत पाटील यांनी दिले असे संकेत दिले, अनिल देशुमखांबाबत म्हणाले...

Next

मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानींच्या मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी (mukesh ambani explosive news) पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकारची कोंडी झाली आहे. एनआयएने केलेल्या चौकशीमध्ये सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी काही बडे पोलीस अधिकारी आणि नेत्यांची नावे घेतल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणात सरकारसमोरील वाढत असलेल्या अडचणींच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त आणि राज्याचे गृहमंत्री बदलले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी याप्रकरणी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. (State Home Minister and Mumbai Police Commissioner will not change, informed Jayant Patil)

आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक होणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आलेल्या जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, गृहमंत्री आणि मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याबाबत कोणतेही अंदाज बांधण्याची गरज नाही. गृहमंत्र्यांच्या राजीनामा घेण्याची गरज नाही. त्यामुळे अशा वावड्या उठवण्याची गरज नाही. राज्याच्या गृहमंत्रीपदी अनिल देशमुख हेच राहणार आहेत. माध्यमांमध्ये कुणाच्याही नावांची चर्चा असली तरी खातेबदल होण्याची शक्यता नाही. 

सचिन वाझे प्रकरणामध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कुठलीही चूक केल्याचे दिसून आलेले नाही. गृहमंत्री अनिल देशमुख हे योग्य प्रकारे काम करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात सुरुवातीला एटीएस तपास करत होती. नंतर त्यात एनआयएने तपास सुरू केला. त्यांना अधिक माहिती मिळाली. त्यानुसार कारवाई झाली. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालण्याचा सरकारचा हेतू नाही. तपासामधून जे सत्य समोर येईल, ते न लपवता आम्ही कारवाई करणार आहोत, असे जयंत पाटील यांनी सांगितले. 

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, यानंतर या गाडीच्या मालकाचा मृतदेह आढळला, या संपूर्ण प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर विरोधकांनी विधिमंडळ अधिवेशनात ठाकरे सरकारला कोंडीत पकडलं होतं, तेव्हा गृहमंत्री अनिल देशमुखांपासून इतर सत्ताधारी आमदारांनी वाझेंची पाठराखण केली होती, इतकचं नव्हे तर सचिन वाझे हे लादेन आहेत का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला होता. 

सध्या NIA कडून मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांच्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. यात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात पुरावे सापडल्याने NIA ने त्यांना अटक केली आहे, यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला तडा गेला आहे. यासाठी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शरद पवारांनी काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली, या भेटीनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मंत्रिपदावर गंच्छती येण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Web Title: State Home Minister and Mumbai Police Commissioner will not change, informed Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.