शिवसेनेला मोठा धक्का! जळगाव जिल्ह्यातील आमदाराचं सदस्यत्व धोक्यात, जात प्रमाणपत्र रद्द

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2020 09:36 AM2020-11-07T09:36:25+5:302020-11-07T09:39:25+5:30

Shiv Sena MLA Lata Sonawane News: चोपडा येथील शिवसेनेच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध ठरविण्यात आला आहे.

Shiv Sena MLA Lata Sonawane membership in Danger, caste certificate canceled | शिवसेनेला मोठा धक्का! जळगाव जिल्ह्यातील आमदाराचं सदस्यत्व धोक्यात, जात प्रमाणपत्र रद्द

शिवसेनेला मोठा धक्का! जळगाव जिल्ह्यातील आमदाराचं सदस्यत्व धोक्यात, जात प्रमाणपत्र रद्द

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१९ झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून लता सोनवणे यांना तिकीट देण्यात आलंलता सोनवणे यांनी अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या प्रवर्गातून निवडणूक लढवलीनामनिर्देशिन पत्रासोबत जोडलेले टोकरे कोळी प्रमाणपत्र देखील नंदुरबार जात पडताळणी समितीने रद्द ठरवले

जळगाव – राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर अनेक उलथापालथी झालेल्या पाहायला मिळाल्या, सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाला विरोधी पक्षात बसावं लागलं, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन करत सत्ता मिळवली, शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४ आणि काँग्रेस ४४ असं पक्षीय संख्याबळ आहे, इतर पक्ष आणि अपक्षांचा पाठिंबा घेत राज्यात महाविकास आघाडीने बहुमत सिद्ध केलं, त्यामुळे सत्ताधारी पक्षाला एक एक आमदार महत्त्वाचा आहे, यातच शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

चोपडा येथील शिवसेनेच्या आमदार लता चंद्रकांत सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध ठरविण्यात आला आहे. सत्ताधारी आमदारांचा जातीचा दाखला अवैध ठरल्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना असल्याचं सांगितलं जात आहे. जळगाव मनपा निवडणुकीच्यावेळी लता सोनवणे यांनी नामनिर्देशन पत्रासोबत जोडलेले टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्रदेखील नंदुरबार जात पडताळणी समितीने रद्द ठरवले आहे.

चोपडा येथील शिवसेनेच्या आमदार लता सोनवणे यांचा अनुसूचित जमातीचा दाखला नंदुरबार येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीने अवैध ठरवला आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला मोठाच धक्का बसला आहे. २०१९ झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून लता सोनवणे यांना तिकीट देण्यात आलं, त्यांच्याविरुद्ध जगदीशचंद्र रमेश वळवी(राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाकर गोटू सोनवणे(भाजपा बंडखोर) माधुरी पाटील(अपक्ष), डॉ. चंद्रकांत बारेला(अपक्ष) या प्रमुख उमेदवारांनी लढत दिली. यात पराभूत उमेदवार जगदीशचंद्र वळवी यांनी आमदार सोनवणे यांच्या जात प्रमाणपत्राला औरंगाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं.

विधानसभा निवडणुकीपूर्वी लता सोनवणे यांनी जळगाव महानगरपालिका निवडणुकीत अनुसूचित जमाती या राखीव जागेसाठी निवडणूक लढवली होती. यात त्यांनी नामनिर्देशिन पत्रासोबत जोडलेले टोकरे कोळी प्रमाणपत्र देखील नंदुरबार जात पडताळणी समितीने रद्द ठरवले आहे. लता सोनवणे यांनी अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या प्रवर्गातून निवडणूक लढवली असल्यामुळे तसेच अनुसूचित जमातीच्या प्रमाण पत्राच्या आधारे नसलेला लाभ मिळवलेला असल्याने त्यांच्याविरुद्ध उचित कारवाई करण्यात यावी व केलेली कारवाई जात पडताळणी समिती, नंदुरबार कार्यालयास अवगत करावी असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी सुरुवातीला त्यांचे दीर शाम सोनवणे यांनीदेखील अर्ज दाखल केला होता. यानंतर मग जिल्ह्यातील शिवसेना नेत्यांच्या आग्रहामुळे प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्याऐवजी पत्नी लता सोनवणे यांना तिकीट देण्यात आले होते.

Web Title: Shiv Sena MLA Lata Sonawane membership in Danger, caste certificate canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.