Video: शिवसेनेला धक्का! साताऱ्यातील नेता स्वगृही परतला; माण खटावमध्ये काँग्रेसची ताकद वाढणार

By प्रविण मरगळे | Published: November 11, 2020 01:01 PM2020-11-11T13:01:50+5:302020-11-11T13:07:10+5:30

Satara Ranjit Deshmukh joined Congress News: रणजित देशमुख यांनी माण खटाव या दुष्काळी तालुक्यात आपलं वर्चस्व राखलं आहे. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते

Shiv Sena leader from Satara Ranjit Deshmukh Joined Congress with presence of Prithiviraj Chavhan | Video: शिवसेनेला धक्का! साताऱ्यातील नेता स्वगृही परतला; माण खटावमध्ये काँग्रेसची ताकद वाढणार

Video: शिवसेनेला धक्का! साताऱ्यातील नेता स्वगृही परतला; माण खटावमध्ये काँग्रेसची ताकद वाढणार

Next
ठळक मुद्देकाँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सातारा दौरा यशस्वी करण्यामागेही रणजित देशमुख यांचा मोलाचा वाटा होता.काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस विचारधारेमुळे त्यांचे शिवसेनेत फारकाळ जमलं नाही.

मुंबई – पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेसने आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याचं पाहायला मिळतं. त्याचाच भाग म्हणून सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि सहकार क्षेत्रातील दबदबा निर्माण करणारे शिवसेनेचे युवा नेते रणजित देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.

रणजित देशमुख यांनी माण खटाव या दुष्काळी तालुक्यात आपलं वर्चस्व राखलं आहे. सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे ते अध्यक्ष होते, २००७ मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या दुष्काळ दौऱ्याचं योग्यरित्या त्यांनी नियोजन केले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सातारा दौरा यशस्वी करण्यामागेही रणजित देशमुख यांचा मोलाचा वाटा होता. मात्र मध्यंतरी काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

काँग्रेसमधून बाहेर पडत रणजित देशमुखांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. माण-खटाव यासारख्या दुष्काळी भागात जवळपास ७० चारा छावण्या सुरू करून रणजित देशमुखांनी मोठा दिलासा दिला होता. मात्र काँग्रेस विचारधारेमुळे त्यांचे शिवसेनेत फारकाळ जमलं नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपासून ते कोणत्याच राजकीय पक्षात सक्रीय नव्हते. अखेर त्यांनी आज काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. रणजित देशमुख यांच्या प्रवेशामुळे साताऱ्यात काँग्रेसला बळ मिळेल असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

काही दिवसांपूर्वीच कराडमध्ये ३५ वर्षाचे राजकीय विरोधक पृथ्वीराज चव्हाण आणि विलासकाका पाटील उंडाळकर यांच्या दिलजमाई झाली. या वादाचा दुसरेच फायदा घेण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता दोन्ही नेत्यांनी दिलजमाई करण्याचा निर्णय घेतलाय. आज विलासकाका उंडाळकर यांच्या चिरंजीवानेही काँग्रेसचा झेंडा हाती घेतला.  

स्थानिक पातळीवरील संस्था ताब्यातून जाण्याची भीती पाटील गटाच्या मनात तर पृथ्वीराज चव्हाण यांनी भविष्यातील काँग्रेसच्या बांधणीसाठीची सुरुवात म्हणून मनोमिलनाला सहमती दर्शविली आहे. एवढाच यातून अर्थबोध घ्यावा लागेल. विलासराव पाटील-उंडाळकर हे काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते असे काँग्रेसच्या माध्यमातून लढत असताना त्यांनी पहिल्यांदा चरखा या चिन्हावर निवडणूक लढविली. १९८३-८४ आणि ८९ ला देखील त्यांनी प्रामाणिकपणे प्रेमलाकाकी चव्हाण यांच्यासाठी काम केले. त्यानंतर १९९१ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली. त्याला विलासकाकांनी विरोध केला होता. दरम्यानच्या काळात राज्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले आणि विलासकाका मंत्री झाले. त्यानंतर त्यांनी जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याचा सपाटा लावला. त्यांनी दिवंगत चिमणराव कदम, अभयसिंहराजे भोसले, शंकरराव जगताप, विक्रमसिंह पाटणकर, भाऊसाहेब गुदगे यांना ताकद दिली आणि जिल्हा परिषद ताब्यात घेतली. हे करत असताना त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना लांबच ठेवले. मात्र आता काँग्रेस हळूहळू संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

Read in English

Web Title: Shiv Sena leader from Satara Ranjit Deshmukh Joined Congress with presence of Prithiviraj Chavhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.