हातात हात घातल्यानंतर पुन्हा काँग्रेसी 'शत्रू' बावचळले, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 03:53 PM2019-04-06T15:53:03+5:302019-04-06T15:53:55+5:30

भाजपामध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या शत्रुघ्न सिन्हांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

shatrughan sinha slip of tongue during formal congress induction video goes viral on social media | हातात हात घातल्यानंतर पुन्हा काँग्रेसी 'शत्रू' बावचळले, व्हिडीओ व्हायरल

हातात हात घातल्यानंतर पुन्हा काँग्रेसी 'शत्रू' बावचळले, व्हिडीओ व्हायरल

Next

नवी दिल्लीः भाजपामध्ये गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या शत्रुघ्न सिन्हांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपा पक्ष हा लोकशाहीवर नव्हे, तर हुकूमशाहीवर चालतो. भाजपामध्ये वरिष्ठ नेत्यांचा अपमान केला जातो. याच वेळी त्यांनी भाजपावर टीका करता करता काँग्रेसच्या बिहार प्रभारींनाच लक्ष्य केलं आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी बिहार काँग्रेस प्रभारी शक्ती सिंह गोहिल यांना भाजपाचे प्रभारी म्हटलं आहे. त्यांच्यावर स्तुतिसुमनं उधळताना त्यांनी बिहार आणि गुजरातमध्ये भाजपाचा असलेला पाठीचा कणा, असं गोहिलांना उद्देशून म्हटलं आहे. परंतु तात्काळ त्यांची चूक उपस्थित काँग्रेसच्या नेत्यांनीही लक्षात आणून दिली. त्यानंतर त्यांनी आपल्याच अंदाज स्पष्टीकरणही दिलं आहे. आज भाजपाचा स्थापना दिवस आहे आणि मी इथे नवीन खेळाडू आहे. तेव्हा असं होणारच. इथे उपस्थित सर्वच सज्ञान आहे, त्यामुळे ते मला समजून घेऊ शकतात.



आज काँग्रेसमध्ये दाखल झालेले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांना पक्षाने पाटणा-साहिब येथून उमेदवारी दिली. त्यामुळे पाटणा-साहिब लोकसभा मतदारसंघामध्ये आता भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्यात लढत रंगणार आहे. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची यादी आज दुपारी प्रसिद्ध केली. या यादीमध्ये पाटणासाहिब येथून शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी देण्याची घोषणा करण्यात आली. गेल्या काही काळापासून भाजपाच्या नेतृत्वावर नाराज असलेले ज्येष्ठ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अखेर आज पक्षाल सोडचिठ्ठी देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले.

  

Web Title: shatrughan sinha slip of tongue during formal congress induction video goes viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.