त्या उस्मानीला पुण्यातच चोपायला हवे होते; न्यायालयातून बाहेर पडताच राज ठाकरे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 06:34 PM2021-02-06T18:34:51+5:302021-02-06T18:42:22+5:30

Raj Thackeray news on Elgar Parishad : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना राज ठाकरे यांनी सशर्त पाठिंबा दिला आहे. यानंतर राज ठाकरेंनी थेट पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमध्ये झालेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला.

Sharjil Osmani should have been beaten in Pune; Raj Thackeray got angry | त्या उस्मानीला पुण्यातच चोपायला हवे होते; न्यायालयातून बाहेर पडताच राज ठाकरे संतापले

त्या उस्मानीला पुण्यातच चोपायला हवे होते; न्यायालयातून बाहेर पडताच राज ठाकरे संतापले

Next

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज जामीन मंजूर करण्यात आला. राज ठाकरे स्वत: न्यायालयात हजर राहिले होते. यानंतर राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली आणि पुणे ते दिल्लीच्या घडामोडींचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. (MNS Leader Raj Thackreay got angry on Sherjil Osmani's comment on Hindu in Elgar Parishad.)


केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांनाही सशर्त पाठिंबा दिला आहे. सरकारने जो कायदा आणलेला आहे तो कायदा चुकीचा नाही. त्यात काही त्रुटी असतील. त्या-त्या राज्यातल्या सरकारांशी त्यांच्या कृषी धोरणांनुसार केंद्र सरकारने समन्वय साधून कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे. काही मोजक्या लोकांच्या हातामध्ये सर्व नियंत्रण जाऊ नये हीच देशवासियांची इच्छा आहे, असे राज ठाकरे म्हणाले. चीन-पाकिस्तानच्या सीमेवरही इतका कडेकोट बंदोबस्त नसेल इतका बंदोबस्त शेतकऱ्यांसाठी करण्याची काहीही आवश्यकता नाही. शेतकरी आंदोलनाचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत असताना पंतप्रधानांनी लक्ष घालून प्रश्न मिटवायला हवा, असे मत व्यक्त केले. 


यानंतर राज ठाकरेंनी थेट पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेमध्ये झालेल्या प्रकारावर संताप व्यक्त केला. पुण्यात शर्जील उस्मानीला तिथेच चोपायला पाहिजे होतं. पण मला प्रश्न पडतो की, त्याला कुणी हे बोलायला लावलंय का? कारण सध्या राज्यात अशाच पद्धतीचं राजकारण सुरु आहे. कुणाला तरी बोलायला लावायचं आणि त्यावर मग राजकारण करायचं, अशा शब्दांत राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला. 

रिहाना? कोण बाई आहे ती? आणि सरकार तिला उत्तर का देतंय?: राज ठाकरेंचा भाजपवर हल्ला


औरंगाबादचे उत्तर शिवसेना-भाजपाने द्यावे
भाजप आणि शिवसेनेची ज्यावेळेस केंद्रात-राज्यात सत्ता होती तेव्हाच 'संभाजीनगर' हे नामांतर का नाही झालं? देशातल्या अनेक शहरांची, दिल्लीतल्या रस्त्यांची नावं बदलली गेली. पण औरंगाबादचं संभाजीनगर का नाही झालं ? ह्याचं उत्तर भाजप-शिवसेनेने द्यावं, अशी मागणीही ठाकरे यांनी केली. 

पक्षीय आंदोलनावर प्रश्नचिन्ह
लोकांसाठी नाही तर एकमेकांना शह-काटशह देण्यासाठी राज्यात सध्या इतर राजकीय पक्षांची आंदोलनं सुरु आहेत. भाजपने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यापेक्षा केंद्राशी बोलावं ना?  तुमचंच सरकार आहे ना, असा सवालही उपस्थित केला आहे.

"मी भाषण केलं, पण मला गुन्हा मान्य नाही", राज ठाकरेंना वाशी न्यायालयाकडून जामीन मंजूर

वाशी टोलनाक्याचे प्रकरण काय?
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात २६ जानेवारी २०१४ ला राज ठाकरे यांची सभा झाली होती. या सभेमध्ये त्यांनी राज्यभरातील टोल वसुलीबाबत संताप व्यक्त केला होता. या वेळी टोलविरोधात त्यांनी भडकावू भाषण केल्यानंतर सभा संपताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी टोलनाक्यावर तोडफोड केली होती. या प्रकरणी मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे व साथीदारांवर गुन्हे दाखल करून अटक झाली होती. तर भडकावू भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावरदेखील वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे २०१८ मध्ये देखील न्यायालयाने त्यांना समन्स काढले होते. मात्र २८ जानेवारीला ते समन्स संपल्याने त्यांना ६ फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने काढले होते. त्यानुसार शनिवारी राज ठाकरे प्रत्यक्ष सीबीडी येथील वाशी न्यायालयात हजर राहिले होते.

Web Title: Sharjil Osmani should have been beaten in Pune; Raj Thackeray got angry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.