“शरद पवारांनी साखरप्रश्नी आदेश भावोजींना नव्हे, तर अमित शहांनाच पत्र लिहिलं होतं”

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2020 03:01 PM2020-07-27T15:01:57+5:302020-07-27T15:04:06+5:30

रोज ओरडता काय, किमान सरकार चालवून तर दाखवा, तीन चाकी ऑटोरिक्षा कुठे न्यायचं हे चालकाला नाही, त्यात बसलेली सवारी ठरवते असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.

"Sharad Pawar had written a letter to Amit Shah; Devendra Fadnavis Target CM Uddhav Thackeray | “शरद पवारांनी साखरप्रश्नी आदेश भावोजींना नव्हे, तर अमित शहांनाच पत्र लिहिलं होतं”

“शरद पवारांनी साखरप्रश्नी आदेश भावोजींना नव्हे, तर अमित शहांनाच पत्र लिहिलं होतं”

Next
ठळक मुद्देसरकार पाडण्यात आम्हाला रस नाही, आम्ही कोरोनाची लढाई लढणार आहोततीन चाकी ऑटोरिक्षा कुठे न्यायचं हे चालकाला नाही, त्यात बसलेली सवारी ठरवतेइतकचं काय तर शरद पवार यांनीही याबाबत अमित शहांनाच पत्र लिहिलं होतं

मुंबई – राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुलाखत घेतली होती, या मुलाखतीतील एका प्रश्नावरुन विरोधकांनी राज्य सरकारला टीकेचे लक्ष्य केले आहे. साखर प्रश्नावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीवर मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीत टीका करण्यात आली होती.

या मुलाखतीचा समाचार घेताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, साखर उद्योगाला मदत देण्यासाठी केंद्रात जो मंत्रिगट तयार झाला आहे, त्याचे अध्यक्ष अमित शहा आहेत, इतकचं काय तर शरद पवार यांनीही याबाबत अमित शहांनाच पत्र लिहिलं होतं, आता हे जर सरकारमधील नेतृत्वाला आणि संपादकांना माहिती नसेल तर शेतकऱ्यांचे काय होणार? असा टोला त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

भाजपा प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस बोलत होते, यात सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही, आम्ही कोरोनाची लढाई लढणार आहोत, पण रोज ओरडता काय, किमान सरकार चालवून तर दाखवा, तीन चाकी ऑटोरिक्षा कुठे न्यायचं हे चालकाला नाही, त्यात बसलेली सवारी ठरवते असं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

शिवसेना नेते संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला होता, यात राऊतांनी साखर प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या अख्यातरित येत नाही का? त्यासाठी गृहमंत्र्याची भेट कशी होऊ शकते? असा सवाल केला होता, त्यावर कदाचित साखर घरात असते, गृहमंत्री म्हणजे आदेश बांदेकरांचा होम मिनिस्टर कार्यक्रम त्यांना वाटला असावा अशी खिल्ली उडवली होती, तसेच ज्यांना सरकार पाडायचं आहे त्यांनी पाडून दाखवावं, या सरकारचं स्टेअरिंग माझ्या हातात आहे असंही उद्धव ठाकरे म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

नियंत्रण सुटलेला जेसीबी दुचाकीस्वाराच्या दिशेने येणार, तितक्यात वेगवान बोलेरो कार आली अन्...

एक ‘असा’ बैल तयार, ज्याची पुढील सर्व पिढी नर म्हणून जन्माला येणार; वैज्ञानिकांचा दावा

७० वर्षीय कोरोना रुग्णाचा बेडवरुन पडून मृत्यू; सरकारी रुग्णालयाचा निष्काळजीपणा उघड

फळं विकणाऱ्या गरीब विक्रेत्याकडून पोलिसांनी माल हिसकावला अन् पैसेही घेतले; व्हिडीओ व्हायरल

Web Title: "Sharad Pawar had written a letter to Amit Shah; Devendra Fadnavis Target CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.