Narayan Rane: “शिवसेना नेत्यांनीही अशी वक्तव्य केलीयेत, त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल केले?”; केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 08:10 PM2021-08-24T20:10:08+5:302021-08-24T20:13:25+5:30

Narayan Rane: आता एका केंद्रीय मंत्र्यांनी शिवसेनेच्या नेत्यांनीही यापूर्वी अशी वक्तव्य केली, त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल केले, असा थेट सवाल केला आहे.

ramdas athawale react on narayan rane arrest during bjp jan ashirwad yatra | Narayan Rane: “शिवसेना नेत्यांनीही अशी वक्तव्य केलीयेत, त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल केले?”; केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

Narayan Rane: “शिवसेना नेत्यांनीही अशी वक्तव्य केलीयेत, त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल केले?”; केंद्रीय मंत्र्यांचा सवाल

Next
ठळक मुद्दे शिवसेनेच्या नेत्यांनीही यापूर्वी अशी वक्तव्य केली, त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल केलेउद्धव ठाकरे यांनी त्यांना भाषणातून उत्तर द्यायला हवे होतेपोलिसांच्या माध्यमातून सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे

नागपूर: केंद्रीयमंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी संगमेश्वर पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांना घेऊन संगमेश्वर पोलीस महाडला रवाना झाले आहेत. नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर राज्यभरात याचे तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर शिवसैनिकांनी राज्यभरात अनेकविध ठिकाणी आंदोलने, निदर्शने केली. यानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यातच आता एका केंद्रीय मंत्र्यांनी शिवसेनेच्या नेत्यांनीही यापूर्वी अशी वक्तव्य केली, त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल केले, असा थेट सवाल केला आहे. (ramdas athawale react on narayan rane arrest during bjp jan ashirwad yatra)

“छत्रपती संभाजी महाराजांनाही संगमेश्वरात अटक झाली होती आणि औरंगजेब सरकार संपलं होतं”

नारायण राणेंच्या अटकेच्या कारवाईवरुन भाजप नेते आणि मित्रपक्षाचे नेतेही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. नारायण राणे यांची जी भाषा आहे ती शिवसेनेचीच भाषा आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देताना शिवसेनेच्या भाषेतूनच उत्तर द्यायचे होते. पण तसे न करता चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे.

“ठाकरे सरकारचा धिक्कार, सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु”; भाजपचा शिवसेनेला इशारा

त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल झाले?

यापूर्वी अनेक शिवसेना नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी असं व्यक्तव्य केले आहे. त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल झाले, पोलिसांनी पकडले दाखवा, असे आव्हान रामदास आठवले यांनी महाविकास आघाडी सरकारला दिले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना भाषणातून उत्तर द्यायला हवे होते. पण पोलिसांकडून कारवाई करुन घेतली ती चुकीची आहे. पोलिसांची यात चूक नाही. पोलिसांच्या माध्यमातून सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई चुकीची आहे, त्यांनी काही गुन्हा केलेला नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

“कुठे छत्रपती संभाजी महाराज आणि कुठे नारायण राणे, काहीही बोलायचं”: अंजली दमानिया

दरम्यान, नारायण राणे यांना ताटकळत ठेवून न्यायालयात हजर करायचे नाही आणि त्यांचा छळ करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राणे यांच्या जीवाला धोका आहे. आता एका मंत्र्याचा व्हिडीओ समोर आलाय. तो मंत्री फोनवरुन पोलीस अधीक्षकांना फोन करुन दबाव टाकताना दिसत आहे, असा गंभीर आरोप भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी केला आहे. 
 

Web Title: ramdas athawale react on narayan rane arrest during bjp jan ashirwad yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.