“नारायण राणे खंबीर आहेत, डगमणारे नेते नाहीत”; रामदास आठवलेंनी दिला जाहीर पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 12:05 AM2021-08-26T00:05:48+5:302021-08-26T00:08:53+5:30

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नारायण राणे यांची भेट घेऊन आपला जाहीर पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.

ramdas athawale meet narayan rane at mumbai after arrest issue | “नारायण राणे खंबीर आहेत, डगमणारे नेते नाहीत”; रामदास आठवलेंनी दिला जाहीर पाठिंबा

“नारायण राणे खंबीर आहेत, डगमणारे नेते नाहीत”; रामदास आठवलेंनी दिला जाहीर पाठिंबा

googlenewsNext
ठळक मुद्देनारायण राणे यांच्यावर झालेली कारवाई ही अन्यायकारक आणि चुकीचीनारायण राणे प्रसंगांना पुरून उरणारे निर्भीड नेते दिल्लीत येऊन झालेल्या प्रकाराची गृहमंत्री अमित शहांना माहिती द्यावी

मुंबई: केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांना मंगळवारी दुपारी अटक करण्यात आल्यानंतर रात्री उशिरा महाड न्यायालयाने नारायण राणे यांना जामीन मंजूर केला. यानंतर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. या सर्व अटक व जामीन नाट्यानंतर बुधवारी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नारायण राणे यांची भेट घेऊन आपला जाहीर पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. (ramdas athawale meet narayan rane at mumbai after arrest issue)

मोदी सरकारकडून आता कोकण रेल्वेचे खासगीकरण? ७२८१ कोटींचा निधी उभारणार

नारायण राणे यांच्यावर झालेली कारवाई ही अन्यायकारक आणि चुकीची असल्याचा आरोप रामदास आठवले यांनी यावेळी केला. राणे यांना रिपाइंचा जाहीर पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. यावेळी रिपाइंचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, एम एस नंदा, प्रकाश जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

“ठाकरे सरकार कामच करत नसेल, तर मग आरत्या ओवाळायच्या का”; भाजपची टीका

नारायण राणे खंबीर आहेत, डगमणारे नेते नाहीत

नारायण राणे हे प्रदीर्घ अनुभव घेतलेले नेते असून त्यांच्यावर झालेली पोलिसी कारवाई अन्यायकारक चुकीची आहे. अशा प्रसंगांना पुरून उरणारे निर्भीड नेते नारायण राणे असून, अशा प्रसंगांमुळे डगमणारे नेते नाहीत. ते खंबीर आहेत. निडर अहेत. त्यांनी दिल्लीत येऊन झालेल्या प्रकाराची गृहमंत्री अमित शहांना माहिती द्यावी, असा सल्ला रामदास आठवले यांनी यावेळी दिल्याचे सांगितले जात आहे. 

नारायण राणे यांची शिवसेनेचीच भाषा 

नारायण राणे यांची जी भाषा आहे ती शिवसेनेचीच भाषा आहे. त्यामुळे त्यांना उत्तर देताना शिवसेनेच्या भाषेतूनच उत्तर द्यायचे होते. यापूर्वी अनेक शिवसेना नेत्यांनी आणि शिवसैनिकांनी असे व्यक्तव्य केले आहे. त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल झाले, पोलिसांनी पकडले दाखवा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना भाषणातून उत्तर द्यायला हवे होते. पोलिसांची यात चूक नाही. पोलिसांच्या माध्यमातून सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. नारायण राणे यांनी काही गुन्हा केलेला नाही, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: ramdas athawale meet narayan rane at mumbai after arrest issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.