माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेणार नाही; संरक्षणमंत्र्यांचा ठाकरे सरकारला स्पष्ट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2020 08:12 PM2020-09-12T20:12:58+5:302020-09-12T20:25:59+5:30

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; माजी नौदल अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी

Rajnath Singh Spoke To Retired Naval Officer Madan Sharma Who Was Attacked By Hooligans In Mumbai | माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेणार नाही; संरक्षणमंत्र्यांचा ठाकरे सरकारला स्पष्ट इशारा

माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेणार नाही; संरक्षणमंत्र्यांचा ठाकरे सरकारला स्पष्ट इशारा

googlenewsNext

मुंबई: नौदलातील माजी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीवरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दांत सिंह यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. सिंह यांनी मदन शर्मा यांच्याशी संवादही साधला आहे. 

'माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी सैनिकांवरील अशा प्रकारचे हल्ले निषेधार्ह असून ते कदापि खपवून घेतले जाणार नाहीत,' असं राजनाथ सिंह म्हणाले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. 'माजी नौदल अधिकाऱ्यावर झालेला हल्ला सरकार पुरस्कृत दहशतवाद आहे. मी ट्विटच्या माध्यमातून याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं लक्ष वेधलं. पण १० मिनिटांत ६ आरोपींची सुटका झाली,' अशा शब्दांत फडणवीस यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे.

"ही तर राज्यपुरस्कृत दहशत, आरोपींची 10 मिनिटांत सुटका", फडणवीसांचा शिवसेनेवर हल्लाबोल




राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; माजी नौदल अधिकाऱ्याच्या मुलीची मागणी
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील एक कथित व्यंगचित्र शेअर केल्याबद्दल माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण झाली. यानंतर मदन यांच्या कन्या शीला शर्मा यांना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. एक मेसेज फॉरवर्ड केल्यानं माझ्या वडिलांना धमक्या येत होत्या. त्यानंतर काही शिवसैनिकांनी माझ्या वडिलांवर हल्ला केला, असं शीला यांनी सांगितलं.

लक्ष्मीबाई, वीर शिवाजी यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझे कार्य पुढे करत राहीन - कंगना राणौत




...तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा
'मी जखमी असून तणावाखाली आहे. माझ्यासोबत घडलेला प्रकार अतिशय दु:खद आहे. मला उद्धव ठाकरेंना सांगावंसं वाटतं की त्यांना कायदा आणि सुव्यवस्था राखता येत नसेल, तर त्यांनी राजीनामा द्यावा. त्यांच्या जागी कोणाला आणायचं, याचा निर्णय जनता येईल,' असं मदन शर्मा म्हणाले. 'ते मला, माझ्या मुलांना, माझ्या कुटुंबाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे माझ्या कुटुंबाला संरक्षण द्या,' अशी मागणी शर्मांनी मुख्यमंत्र्यांकडे करतो.

Web Title: Rajnath Singh Spoke To Retired Naval Officer Madan Sharma Who Was Attacked By Hooligans In Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.