राहुल गांधींनी वचन पाळले, १२ वर्षीय मुलाला स्पोर्ट्स शूज भेट म्हणून दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 04:42 PM2021-03-10T16:42:22+5:302021-03-10T16:44:05+5:30

Congress leader Rahul Gandhi kept his promise : काँग्रेसचे नेते राहुल गांधी सध्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. यादरम्यान ते विविध ठिकाणी लहान मुलांची तसेच विद्यार्थ्यांचीही भेट घेताना दिसत आहेत.

Rahul Gandhi kept his promise and gave sports shoes to a 12-year-old boy | राहुल गांधींनी वचन पाळले, १२ वर्षीय मुलाला स्पोर्ट्स शूज भेट म्हणून दिले

राहुल गांधींनी वचन पाळले, १२ वर्षीय मुलाला स्पोर्ट्स शूज भेट म्हणून दिले

googlenewsNext

नवी दिल्ली - काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi )  सध्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2021) प्रचारात व्यस्त आहेत. यादरम्यान ते विविध ठिकाणी लहान मुलांची तसेच विद्यार्थ्यांचीही भेट घेताना दिसत आहेत. यादरम्यान, राहुल गांधी यांनी कन्याकुमारी येथे गेले असताना त्यांची भेट १२ वर्षीय अँटनी फेलिक्स या मुलाशी झाली होती. त्यावेळी त्यांनी त्याला शूज देण्याचे वचन दिले होते. त्या वचनानुसार राहुल गांधी यांनी फेलिक्स याला स्पोर्टस् शुज पाठवत वचनपूर्ती केली आहे. (Rahul Gandhi kept his promise and gave sports shoes to a 12-year-old boy)
 
राहुल गांधी हे कन्याकुमारीच्या दौऱ्यावर असताना तिथे फेलिक्स हा तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के. कामराज यांचा पोस्टर घेऊन उभा होता. राहुल गांधी हे चहा पिण्यासाठी एका स्टॉलवर गेले असताना त्यांची नजर या मुलाकडे गेली. त्यावेळी राहुल गांधी यांनी या मुलाची विचारपूस केली. तेव्हा फेलिक्सने मी १०० मीटर शर्यतीमधील धावपटू असल्याचे राहुल गांधींना सांगितले होते. मग राहुल गांधींनी धावताना शूज घालून धावतोस की अनवानी पायांनी अशी विचारणा त्याच्याकडे केली होती. तेव्हा त्याने आपण अनवानी पायांनी धावत असल्यासे सांगितले.   

तेव्हा राहुल गांधी यांनी त्याला स्पोर्टस् शूज पाठवून देण्याचे तसेच त्याला प्रशिक्षणासाठी कुठल्यातरी अकादमीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते, ते वचन पूर्ण करताना आता राहुल गांधी यांनी फेलिक्स याला स्पोर्टस् शूज पाठवून दिले आहेत.   

Web Title: Rahul Gandhi kept his promise and gave sports shoes to a 12-year-old boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.