'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात फूट पाडली'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 04:42 AM2019-04-18T04:42:52+5:302019-04-18T04:44:37+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील समाजात फूट पाडली आणि समाजातील विविध घटकांमध्ये भांडणे लावून दिली

'Prime Minister Narendra Modi broke up in country' | 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात फूट पाडली'

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात फूट पाडली'

Next

कन्नूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील समाजात फूट पाडली आणि समाजातील विविध घटकांमध्ये भांडणे लावून दिली, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला. देशामधील वाढती बेकारी, शेतकरी करत असलेल्या आत्महत्या आदी गंभीर समस्यांना मोदीच जबाबदार आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
ते म्हणाले की, मोदींच्या कारभारामुळे रोज देशातील २७ हजार युवक बेकार होत आहेत. कृषी क्षेत्राची पुरती वाट लागली आहे. राफेल विमाने खरेदी व्यवहाराच्या निमित्ताने मोदी यांनी स्वत:चा उद्योगपती मित्र अनिल अंबानी यांना ३० हजार कोटी रुपये दिले. हे एकप्रकारे देशद्रोही वर्तनच आहे. या गैरकृत्यांबद्दल मोदींनी स्पष्टीकरण द्यायला हवे. आर्थिक मागासलेपण, शेतीच्या समस्या तसेच भ्रष्टाचार या तीन मुद्द्यांबद्दल देशात सर्वंकष चर्चा झाली पाहिजे. पण मोदी यांनी आजवर एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही.


केरळच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी काही ठिकाणी प्रचारसभा घेतल्या. केरळमधील वायनाडमधूनही राहुल गांधी लोकसभा निवडणूक लढत असल्याने त्यांच्या या दौºयाला विशेष महत्त्व होते. लोकसभा निवडणुकांच्या तिसºया टप्प्यात केरळमध्ये २३ एप्रिलला मतदान होणार आहे. 

>‘खोटी आश्वासने देणार नाही’
वायनाडमधील जनतेला मी खोटी आश्वासने देणार नाही. त्यांचे प्रश्न सोडविण्यावर माझा भर राहील असे राहुल गांधी यांनी प्रचारसभेत सांगितले. मी इथे ‘मन की बात‘ सांगायला नव्हे, तर लोकांच्या मनातले जाणून घ्यायला आलो आहे असा टोला त्यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला. राहुल गांधी यांचे वडील राजीव गांधी यांच्या अस्थींचे तीस वर्षांपूर्वी वायनाड परिसरातील तिरूनेल्ली मंदिराजवळ पापनाशिनी नदीत विसर्जन करण्यात आले होते.

Web Title: 'Prime Minister Narendra Modi broke up in country'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.