Pooja Chavan Suicide case : संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 04:03 PM2021-02-13T16:03:52+5:302021-02-13T16:11:31+5:30

Pooja Chavan Suicide case, Sanjay Rathod wants to meet CM Uddhav Thackeray : पूजा चव्हाण ही मुळची बीडच्या परळीची आहे. तिच्या आत्महत्येनंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या पूजासोबत बोलतानाच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कथित दहा-बारा क्लिपही व्हायरल झाल्याने राज्यभरात हा विषय तापलेला आहे. राठोड यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. 

Pooja Chavan Suicide case, Sanjay Rathod wants to meet CM Uddhav Thackeray | Pooja Chavan Suicide case : संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली, पण...

Pooja Chavan Suicide case : संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांची वेळ मागितली, पण...

Next

मुंबई, पुणे : पुण्यातील पूजा चव्हाणआत्महत्याप्रकरणी (Pooja Chavan Suicide case) शिवसेना चांगलीच अडचणीत आलेली आहे. सत्तेत येऊन वर्ष होत नाही तोच नाजूक प्रकरणांतील तिसरे मोठे प्रकरण घडल्याने महाविकास आघाडीही मेटाकुटीला आली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) कमालीचे सावध झाल्याचे दिसत आहेत. (Pooja Chavan suicide case Maharashtra)


पूजा चव्हाण ही मुळची बीडच्या परळीची आहे. तिच्या आत्महत्येनंतर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्या पूजासोबत बोलतानाच्या आणि पुरावे नष्ट करण्याच्या कथित दहा-बारा क्लिपही व्हायरल झाल्याने राज्यभरात हा विषय तापलेला आहे. राठोड यांचे मंत्रिपद जाण्याची शक्यता आहे. 


यावर राठोड यांनी आपली बाजू मांडण्यासाठी उद्धव ठाकरेंची वेळ मागितल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, ठाकरे यांनी अद्याप त्यांना वेळ दिलेली नाही. तसेच फोनवरही बोलणे झालेले नाही. याउलट मातोश्रीवरून राठोड यांना तसेच अन्य नेत्यांना या प्रकरणावर प्रसारमाध्यमांमध्ये काहीच बोलू नये, असे आदेश गेलेले आहेत. 


आज सकाळीच पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यामध्ये त्यांनी दोन दिवसांत पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणातील तपासाची माहिती दिल्याचे समजते आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री गंभीर असून ते राठोड दोषी आढळले तर त्यांच्यावर कारवाई करू शकतात. यामुळे राठोड यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा आहे. 
दुसरीकडे पूजा चव्हाण प्रकरणी मुख्यमंत्री संवेदनशील; केवळ आरोपावरून कारवाई करणं चुकीचे आहे, असे माजी मंत्री आणि शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी म्हटले आहे. 


पूजा चव्हाण कोण?
पुण्यामधील एका उच्चभ्रू सोसायटीत राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने रविवारी ७ फेब्रुवारी रोजी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. तिच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावरून उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली होती. त्यानंतर या प्रकरणात महाविकासआघाडी सरकारमधील शिवसेनेचे मंत्री असलेले संजय राठोड यांचे नाव समोर आले होते. संजय राठोड यांचे नाव समोर आल्यानंतर विरोधी पक्षात असलेल्या भाजपाने या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली आहे.

पूजा चव्हाण ही २२ वर्षीय तरूणी बीड जिल्ह्यातील परळीत राहणारी होती, परळीत तिचे आई-वडील राहतात, पूजाच्या ५ बहिणींपैकी ४ बहिणींची लग्न झाली आहे, पूजा कुटुंबाला मुलासारखी होती, फेसबुक, इन्स्टाग्रामवर पूजाचे लाखो चाहते होते, ती डॅशिंग होती, १ महिन्यापूर्वी पूजा पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लासेससाठी आली होती. भाऊ विलास चव्हाण व मित्र अरुण राठोड यांच्या सोबत ती भाड्याच्या सदनिकेमध्ये राहत होती.

Read in English

Web Title: Pooja Chavan Suicide case, Sanjay Rathod wants to meet CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.