Pooja Chavan : "हे शक्तिप्रदर्शन नव्हे, तर मुख्यमंत्र्यांचं अवमान प्रदर्शन," संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका

By बाळकृष्ण परब | Published: February 23, 2021 12:30 PM2021-02-23T12:30:02+5:302021-02-23T12:35:11+5:30

Pooja Chavan Suicide Case, Sanjay Rathod in Pohragad : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आरोप झाल्यानंतर सुमारे १५ दिवस बेपत्ता असलेले संजय राठोड हे आज सकाळी पहिल्यांदाच सर्वांसमोर आले असून, घरामधून बाहेर पडल्यानंतर ते पोहरादेवी येथे दर्शनासाठी रवाने झाले.

Pooja Chavan: Sudhir Mungantiwar Criticize Sanjay Rathod Says, "This is not a show of strength, but an insult to the Chief Minister" | Pooja Chavan : "हे शक्तिप्रदर्शन नव्हे, तर मुख्यमंत्र्यांचं अवमान प्रदर्शन," संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका

Pooja Chavan : "हे शक्तिप्रदर्शन नव्हे, तर मुख्यमंत्र्यांचं अवमान प्रदर्शन," संजय राठोड यांच्यावर जोरदार टीका

Next

मुंबई/यवतमाळ - पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात (Pooja Chavan Suicide Case) आरोप झालेले राज्य सरकारमधील मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) हे आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत पोहरादेवी येथे दर्शनासाठी आले आहेत. या प्रकरणात आरोप झाल्यानंतर सुमारे १५ दिवस बेपत्ता असलेले संजय राठोड हे आज सकाळी पहिल्यांदाच सर्वांसमोर आले असून, घरामधून बाहेर पडल्यानंतर ते पोहरादेवी येथे दर्शनासाठी रवाने झाले. दरम्यान, संजय राठोड यांना पाठिंबा देण्यासाठी समर्थकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. आता या गर्दीवरून भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राठोड आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. (Sudhir Mungantiwar Criticize Sanjay Rathod Says, "This is not a show of strength, but an insult to the Chief Minister")

संजय राठोड हे पोहरादेवी येथे येत असताना त्यांच्या स्वागतासाठी समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राठोड म्हणाले की, कोणत्याही आरोपाला शक्तिप्रदर्शनाने उत्तर देता येत नाही. तसेच शक्तिप्रदर्शनातून निर्दोषत्व सिद्ध होत नाही. त्यासाठी चौकशीला सामोरे निर्दोषत्व सिद्ध करावे लागते. निर्दोष असतील तर संजर राठोड यांनी पोलीस ठाण्यात जाऊन स्पष्टीकरण दिले पाहिजे. निर्दोष असतील तर ते सिद्ध होईल.

कोरोनाच्या काळात अशी गर्दी जमवणे वाईट आहे. त्यासाठी त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. आज गर्दी जमवण्याऐवजी त्यांनी पहिल्याच दिवशी समोर येऊन स्पष्टीकरण दिले पाहिजे होते. दरम्यान. संजय राठोड करत असलेले शक्तिप्रदर्शन हे शक्तिप्रदर्शन नसून हे मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाचे अवमान प्रदर्शन आहे. एका मंत्र्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाच्या, आवाहनाच्या ठिकऱ्या उडवल्या आहे. राठोड यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवले की, तुमच्या आवाहनाला जनता सोडा तुमच्या सरकारमधील मंत्री भीक घालत नाही.

मात्र सच परेशान होता है पराजित नाही. आता केस दाबली तरी पुढे दोन वर्षांनी, चार वर्षांनी हे प्रकरण बाहेर येईल. उत्तर प्रदेशमधील अमरमणी त्रिपाठीच्या प्रकरणात पाहिले की, ते काही दिवस वाचले. मात्र आता ते जन्मठेप भोगत आहेत, असे संकेतही सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

Web Title: Pooja Chavan: Sudhir Mungantiwar Criticize Sanjay Rathod Says, "This is not a show of strength, but an insult to the Chief Minister"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.