Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'चहावाला' नाहीत, तर...; भाऊ प्रल्हाद मोदींनी केला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2021 08:31 AM2021-08-01T08:31:20+5:302021-08-01T08:32:15+5:30

व्यापाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने गाेलमैदान येथील सोमय्या हॉलमध्ये शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले

PM Narendra Modi is not a 'tea Seller', Brother Pralhad Modi made a big revelation | Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'चहावाला' नाहीत, तर...; भाऊ प्रल्हाद मोदींनी केला मोठा खुलासा

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी 'चहावाला' नाहीत, तर...; भाऊ प्रल्हाद मोदींनी केला मोठा खुलासा

Next

उल्हासनगर (ठाणे) : ‘आमच्या वडिलांनी चहा विकून आम्हा सहा भावंडांचे पालनपोषण केले. त्यावेळी ज्याचा नंबर असेल तसा आम्हीही चहा विकला; पण चहावाले आम्ही नव्हतो, तर आमचे वडील होते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चायवाला’ म्हणण्यापेक्षा त्यांना चहावाल्याचा मुलगा म्हणा. आम्ही चहावाल्याची मुले आहोत’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ आणि ऑल इंडिया फेअर प्राइज शॉपचे अध्यक्ष प्रल्हाद मोदी यांनी येथे केले.

व्यापाऱ्यांच्या समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी उल्हासनगर ट्रेड असोसिएशनच्या वतीने गाेलमैदान येथील सोमय्या हॉलमध्ये शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. व्यापाऱ्यांनी जीएसटीवर सामूहिक बहिष्कार टाकल्यास, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच नव्हे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा तुमच्याकडे येतील, असे ते यावेळी म्हणाले.

जाणून घेतल्या समस्या
यूटीए व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमित चक्रवर्ती, नगरसेवक मनोज लासी, दीपक छतवानी, आकाश चक्रवर्ती, दीपक राजवानी आदींनी व्यापाऱ्यांच्या विविध समस्यांचा पाढा यावेळी वाचला. प्रल्हाद मोदी यांनी व्यापाऱ्यांच्या समस्या देशपातळीवर मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

Web Title: PM Narendra Modi is not a 'tea Seller', Brother Pralhad Modi made a big revelation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.