लोक लसींचा स्लॉट शोधत राहिले; इकडे भाजपा खासदारांनी अख्ख्या स्टाफचेच लसीकरण करून टाकले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 12:27 PM2021-05-15T12:27:36+5:302021-05-15T12:30:08+5:30

Corona Vaccination VIP Culture BJP MP Anil Firojia: लशीची मोठी टंचाई असताना आलेली लस लोकांना देण्याऐवजी मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील भाजपा खासदारांनी लसीकरण टीमलाच घरी बोलावून घरच्यांना तसेच कार्यकर्त्यांना लस देऊन टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.

People kept looking for corona vaccine slots; Here, the BJP MP Anil Firojia vaccinated the entire staff | लोक लसींचा स्लॉट शोधत राहिले; इकडे भाजपा खासदारांनी अख्ख्या स्टाफचेच लसीकरण करून टाकले

लोक लसींचा स्लॉट शोधत राहिले; इकडे भाजपा खासदारांनी अख्ख्या स्टाफचेच लसीकरण करून टाकले

Next

Corona Vaccination Fraud: वय बसत नसताना नेत्यांच्या नातेवाईकांनी देखील ओळख लावून लस टोचून घेतल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत. तर दुसरीकडे जिवाच्या आकांताने लोक कोरोना लस कुठे मिळेल, याचा शोधाशोध करत आहेत. लशीची मोठी टंचाई असताना आलेली लस लोकांना देण्याऐवजी मध्य प्रदेशच्या उज्जैनमधील भाजपा खासदारांनी लसीकरण टीमलाच घरी बोलावून स्टाफला तसेच कार्यकर्त्यांना लस देऊन टाकल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. (Administration of corona vaccination to the staff of BJP’s Member of Parliament (MP) Anil Firojia caused a furore in local politics in Ujjain on Friday.)


धक्कादायक म्हणजे या लसीकरणाचे फोटो त्यांच्या कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर टाकल्याने नवा वाद सुरु झाला आहे. लोक कोरोना लसीसाठी भटकत असताना खासदारांनी व्हीआयपी कल्चर दाखवत लोकांच्या तोंडाला पाने पुसल्याची टीका होऊ लागली आहे. (MP’s staffers posted photos of the vaccination on social media.)


उज्जैन जिल्ह्यात 18 ते 44 वयोगटातील लोक लस मिळत नसल्याने त्रस्त झाले आहेत. तर 45 पेक्षा जास्त वयाच्या लोकांना दुसरा डोसही मिळत नाहीय. अशातच उज्जैनच्या आलोटचे खासदार अनिल फिरोजिया (Anil Firojia) यांनी आपल्या कार्यालयातील स्टाफला लस देऊनही टाकली आहे. 


भाजपा खासदारांच्या कार्यालयातील जवळपास 14 लोकांचे लसीकरण झाले आहे. या स्टाफनेच सोशल मीडियावार लसीकरणाचे फोटो टाकले आणि आता ते व्हायरल झाले आहेत. मध्य प्रदेशच्या तरुणांनी या व्हीआयपी कल्चरवरून टीका करण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे काँग्रेसनेदेखील यावर टीका केली आहे. 


सांगितले जात आहे की, आरोग्य विभागाची टीम फिरोजिया यांच्या कार्यालात दोनदा गेली होती. या वेळी त्यांनी फिरोदिया यांचा स्टाफ आणि समर्थकांना लस टोचली आहे. जेव्हा पत्रकारांनी खासदारांना या बाबत विचारले तेव्हा त्यांनी या प्रश्नांचे उत्तर देणे टाळले. तर कोरोना प्रभारी मंत्री डॉ. मोहन यादव यांनी सांगितले की, आपल्याला याची काही माहिती नाही. 


या प्रकरणातील जबाबदार अधिकारी यावर काहीच बोलायला तयार नाहीत. तर काँग्रेस नेत्यांनी जेथे सामान्य लोकांना कोरोना लस मिळत नाहीय, तिथे भाजपाच्या लोकांना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत आहे. 

Web Title: People kept looking for corona vaccine slots; Here, the BJP MP Anil Firojia vaccinated the entire staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.