"पवार साहेब, दारूवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच, पण...", अनिल बोंडेची पत्राद्वारे शरद पवारांना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 01:14 PM2021-05-12T13:14:05+5:302021-05-12T13:39:43+5:30

Anil Bonde : अनिल बोंडे यांनी शरद पवारांना लिहिले हे पत्र सध्या सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहे.

"Pawar Saheb, alcoholics will bless you, but ...", Anil Bonde's request to Sharad Pawar in a letter | "पवार साहेब, दारूवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच, पण...", अनिल बोंडेची पत्राद्वारे शरद पवारांना विनंती

"पवार साहेब, दारूवाले तुम्हाला आशीर्वाद देतीलच, पण...", अनिल बोंडेची पत्राद्वारे शरद पवारांना विनंती

googlenewsNext
ठळक मुद्देमजुरी नाही, रोजगार नाही. रोजच्या खाण्यापिण्याचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे गोरगरिबांचे वीज बिल माफ करण्यासाठी पत्र लिहा, अशी विनंती अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना पत्राद्वारे केली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील परवानाधारक हॉटेल व बार मालकांना करसवलत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. यावरून माजी कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी शरद पवारांना पत्र लिहिले आहे. "पवार साहेब मुख्यमंत्री फक्त तुमचेच ऐकतात. दारूवाल्यांसाठी तुम्ही कळकळीने पत्र लिहिले. दारूवाले तुम्हाला त्यांचे आशीर्वाद देतीलच, किंबहुना दारूवाल्यांच्या आशिर्वादांवरच तुमची मदार असेल, परंतु महाराष्ट्रातील 150 लाख शेतकरी कुटुंब सारे अडचणीत आहे. शेतमजूर सुद्धा सरकारकडे आशेने बघत आहे. बारा बालुतेदारांनाही जगण्यासाठी सरकारच्या मदतीची आवश्यकता आहे. यासर्व शेतकरी, शेतमजूर व बारा बलुतेदारांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहा", अशी विनंती अनिल बोंडे यांनी शरद पवारांना पत्राद्वारे केली आहे. अनिल बोंडे यांनी शरद पवारांना लिहिले हे पत्र सध्या सोशल मीडियात चांगलेच व्हायरल झाले आहे. (Former Minister Dr Anil Bonde Writes Open Letter To NCP Chief Sharad Pawar)

अनिल बोंडे यांनी पत्रात म्हटले आहे की, "गावखेड्यातील शेतमजूर, वाजंत्रीवाले, नाभिकांसह सर्व बारा बलुतेदार आज आर्थिक संकटात आहेत. स्वतःचं कुटुंब पोसण्याचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. मायबाप सरकार पुन्हा लॉकडाऊन वाढवणार आहे. अशा वेळी या सर्वांना मदतीची गरज आहे. करोनाच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पंतप्रधान मोदींनी सहा हजार रुपये टाकले. महाराष्ट्रातील अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक अशा ९४ लाख शेतकऱ्यांना त्यामुळं आधार मिळाला. पण, ठाकरे सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात दमडीही टाकली नाही. ९४ लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यांची माहिती ठाकरे सरकारकडे आहे. या खात्यांमध्ये त्यांनी सहा हजार रुपये टाकणे गरजेचे आहे. त्यासाठी  पवार साहेबांनी पत्र लिहावे."

("आता केवळ आत्महत्या करणे बाकी आहे", व्हेंटिलेटर चालू नसल्यामुळे भाजपा आमदाराचा संताप)

याचबरोबर, "कोरोनामुळे कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद आहेत. धान्य, कांदा, भाजीपाला सुद्धा विकता येत नाही. अवकाळीची नुकसान भरपाई अनेक शेतकऱ्यांना मिळाली नाही. हेक्टरी २५ हजार रुपये मदतीची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरवला आणि १० हजार रुपये हेक्टरवर बोळवण केली. अतिवृष्टीचे निकष लावून अवकाळीनं बाधित शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आलं. गेल्या दोन महिन्यांत विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा अवकाळी पाऊस, वादळे झाली. शेतकऱ्यांचा कांदा, आंबा याचे अतोनात नुकसान झाले. परंतु सरकारनं साधी दाखलही घेतली नाही. या अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहा."

(भारतातील कोरोना व्हेरिएंटचा जगात हाहाकार! 44 देशांमध्ये प्रादुर्भाव असल्याचे WHO ने सांगितले)

"कोरोना काळातील घरगुती वीज बिल माफ करू. अशी घोषणा ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केली होती. मात्र, पहिली लाट ओसरताच महावितरणनं निर्दयीपणे सर्वसामान्यांचे वीज कनेक्शन कापण्यास सुरुवात केली. ऊर्जामंत्र्यांनी शब्द फिरवले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी तोंडाला कुलूप लावले. आणि आता तर पुन्हा लॉकडाऊन लावला. मजुरी नाही, रोजगार नाही. रोजच्या खाण्यापिण्याचा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे गोरगरिबांचे वीज बिल माफ करण्यासाठी पत्र लिहा", अशी विनंती अनिल बोंडे यांनी शरद पवार यांना पत्राद्वारे केली आहे.

Web Title: "Pawar Saheb, alcoholics will bless you, but ...", Anil Bonde's request to Sharad Pawar in a letter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.