पार्थनं घेतली अजित पवारांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट; अनेकांच्या भूवया उंचावल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 12:56 PM2021-03-30T12:56:31+5:302021-03-30T12:57:50+5:30

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपातून इंदापूर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती, परंतु राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांनी त्यांचा दुसऱ्यांदा पराभव केला

Parth Pawar meets BJP leader Harshvardhan Patil who is a staunch opponent of Ajit Pawar | पार्थनं घेतली अजित पवारांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट; अनेकांच्या भूवया उंचावल्या

पार्थनं घेतली अजित पवारांचे कट्टर विरोधक असलेल्या भाजपा नेत्याची भेट; अनेकांच्या भूवया उंचावल्या

googlenewsNext
ठळक मुद्देविधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अनेकदा अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा कलगीतुरा पाहायला मिळत होता. २०१९ च्या निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपात प्रवेश केलाराष्ट्रवादीने इंदापूरची जागा सोडण्यास नकार दिला, त्यामुळे आघाडीत नाराज झालेले हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाची वाट धरली.

इंदापूर – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक मानल्या जाणाऱ्या भाजपा नेत्याची पार्थ पवार(Parth Pawar) यांनी भेट घेतली, या भेटीनं अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. माजी मंत्री आणि भाजपा नेते हर्षवर्धन पाटील(Harshawardhan Patil) यांची पार्थ पवार यांनी इंदापूरच्या राहत्या घरी भेट घेतली. काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांच्या काकीचं निधन झालं होतं. या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन यांची सांत्वनपर भेट घेतली.

हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांचे(Ajit Pawar) राजकीय विरोधक मानले जातात, २०१९ च्या निवडणुकीपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपात प्रवेश केला, लोकसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दिला, त्यासाठी इंदापूरची जागा सोडण्याची रणनीती आखली होती, परंतु राष्ट्रवादीने इंदापूरची जागा सोडण्यास नकार दिला, त्यामुळे आघाडीत नाराज झालेले हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाची वाट धरली.

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपातून इंदापूर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती, परंतु राष्ट्रवादीचे दत्ता भरणे यांनी त्यांचा दुसऱ्यांदा पराभव केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात अनेकदा अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांचा कलगीतुरा पाहायला मिळत होता. निवडणुकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नव्हती.

मात्र त्यानंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील एकत्र आले होते, तेव्हा अजित पवार म्हणाले होते की, पक्षाच्या भूमिकांच्या मर्यादा पाळायच्या असतात. साखरेसारख्या महत्वाच्या विषयासाठी आम्ही एकत्र आलो होतो. त्यामुळे राजकारणाव्यतिरिक्त बोलणे झाले. आमची राजकीय भूमिका वेगळी असली तरी आम्ही एकमेकांचे दुश्मन नाही असेही सांगायला ते विसरले नाहीत. आम्ही दुश्मन नाही आणि एकमेकांचा बांधही रेटलेला नाही असं सांगायलाही ते विसरले नव्हते.

 

Web Title: Parth Pawar meets BJP leader Harshvardhan Patil who is a staunch opponent of Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.