Pandharpur Election Results Live : पोस्टल मतांच्या पहिल्या फेरीत भगीरथ भालके आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2021 09:46 AM2021-05-02T09:46:10+5:302021-05-02T10:01:51+5:30

Pandharpur Election Results Live: पोस्टल मतांच्या पहिल्या फेरीत भगीरथ भालके आघाडीवर आहेत.

Pandharpur Election Results Live: Bhagirath Bhalke leads in first round of postal votes | Pandharpur Election Results Live : पोस्टल मतांच्या पहिल्या फेरीत भगीरथ भालके आघाडीवर

Pandharpur Election Results Live : पोस्टल मतांच्या पहिल्या फेरीत भगीरथ भालके आघाडीवर

Next
ठळक मुद्देया निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पंढरपूर : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपाकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Pandharpur Election Results Live: Bhagirath Bhalke leads in first round of postal votes)

सकाळी आठ वाजता पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी करण्यात आली. या पोस्टल मतांच्या पहिल्या फेरीत भगीरथ भालके आघाडीवर आहेत. यामध्ये भगीरथ भालके यांना २३१० मते, समाधान आवताडे यांना १३७२ मते, तर अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना ३० मते पडली आहेत. याचबरोबर, पहिल्या फेरीत समाधान आवताडे ३५० मतांनी आघाडीवर होते, तर दुसऱ्या फेरीत भगीरथ भालके ११४ मतांनी आघाडीवर असून तिसऱ्याही फेरीत भगीरथ भालके ६३५ मतांनी आघाडीवर आहेत.

(पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक : भालके की आवताडे? आज होणार फैसला)

दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा ही पोटनिवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्रीमंडळातील बहुतांश मंत्र्यापासून प्रवक्ते अमोल मेटकरी यांच्यापर्यंत सर्वच नेत्यांनी गाजवली. त्यांच्या प्रत्त्युरादाखल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार बाळा भेगडे यांच्यासह भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी गाजवली.

भारत भालकेंची हॅट्रिक
दिवंगत भारत भालके सलग तिसऱ्यांदा या मतदारसंघातून विजयी झाले होते. मात्र या तिन्ही वेळा ते वेगवेगळ्या पक्षातून सभागृहात पोहोचले होते. 2009मध्ये त्यांनी पंढरपूर विधानसभा मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचा पराभव केला आणि ते राजकारणातील जायंट किलर ठरले. 2019 मध्ये त्यांनी माजी आमदार सुधाकर परिचारक यांचा पराभव केला होता.

Web Title: Pandharpur Election Results Live: Bhagirath Bhalke leads in first round of postal votes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.