राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी सत्ताधारी पक्षाकडून आयारामांना संधी; निष्ठावंत प्रतिक्षेत

By प्रविण मरगळे | Published: November 7, 2020 08:46 AM2020-11-07T08:46:53+5:302020-11-07T08:49:28+5:30

12 MLC Nominees to Governor Bhagatsing Koshyari, Shiv Sena, NCP, Congress News: अद्याप महाविकास आघाडीकडून या १२ जणांच्या नावांबाबत प्रचंड गुप्तता पाळली आहे. लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ही १२ नावे जाहीर करतील असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला आहे.

Opportunity from the ruling party for 12 governor-appointed seats; Loyal waiting | राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी सत्ताधारी पक्षाकडून आयारामांना संधी; निष्ठावंत प्रतिक्षेत

राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी सत्ताधारी पक्षाकडून आयारामांना संधी; निष्ठावंत प्रतिक्षेत

Next
ठळक मुद्देअभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक काँग्रेसकडून लढवली होतीचंद्रकांत रघुवंशी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.अलीकडेच भाजपाचा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले खडसेंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अनिरुद्ध वनकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती

मुंबई – राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी अखेर महाविकास आघाडी सरकारने बारा जणांच्या नावाची शिफारस यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सुपूर्द केली, सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी ४ उमेदवारांना संधी दिली, शुक्रवारी महाविकास आघाडीचे मंत्री शिवसेनेचे अनिल परब, राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि काँग्रेसचे अमित देशमुख यांनी राज्यपालांची भेट घेऊन ही यादी दिली.

अद्याप महाविकास आघाडीकडून या १२ जणांच्या नावांबाबत प्रचंड गुप्तता पाळली आहे. लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ही १२ नावे जाहीर करतील असा विश्वास परिवहन मंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर आणि चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची शिफारस केली आहे. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक काँग्रेसकडून लढवली होती, मात्र त्यांना भाजपाचे गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता. तर चंद्रकांत रघुवंशी यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता.

चंद्रकांत रघुवंशी हे १९९२ पासून काँग्रेस पक्षात होते, नंदूरबार जिल्ह्यात रघुवंशी कुटुंब काँग्रेसशी एकनिष्ठ मानलं जात होतं, १२ वर्ष ते विधान परिषदेचे सदस्य होते, विधानसभा निवडणुकीपूर्वी चंद्रकांत रघुवंशी यांनी तत्कालीन आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेचं शिवबंधन हातावर बांधलं होतं. राज्यपाल नियुक्त जागेसाठी शिवसेनेने चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावाची शिफारस केल्याचं बोललं जात आहे त्यामुळे शिवसेनेकडून इच्छुक असलेले सुनील शिंदे, युवासेनेचे राहुल कनाल, वरुण सरदेसाई, मिलिंद नार्वेकर यांना अजूनही प्रतिक्षा यादीत राहावं लागणार आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे उभे राहिल्याने स्थानिक आमदार सुनील शिंदे यांना मतदारसंघ सोडावा लागला होता.

तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे आणि गायक आनंद शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही आयारामांना संधी देण्यात धन्यता मानली आहे. अलीकडेच भाजपाचा सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले खडसेंच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे. तर यशपाल भिंगे यांनी वंचित बहुजन आघाडीकडून नांदेड लोकसभा निवडणूक लढवली होती, या निवडणुकीत त्यांना दीड लाखांच्या आसपास मतदान झालं होतं, त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांना पराभव सहन करावा लागला होता. यशपाल भिंगे हे धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करतात, भिंगेंना उमेदवारी देऊन राष्ट्रवादीने वंचित बहुजन आघाडी आणि भाजपा असे एकाच दगडात दोन पक्षी मारले आहे, नुकतेच भाजपाकडून धनगर समाजाचे गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आले आहे.

दरम्यान काँग्रेसने रजनी पाटील, सचिन सावंत, मुझफ्फर हुसेन आणि अनिरुद्ध वनकर यांना उमेदवारी दिली आहे. यात चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून अनिरुद्ध वनकर यांनी वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवली होती. वनकर हे आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध गायक आहेत, काँग्रेसने राज्यपाल नियुक्त जागेसाठी अनिरुद्ध वनकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारकडून आयारामांना संधी देऊन निष्ठावंतांना प्रतिक्षा यादीत कायम ठेवल्याची चर्चा आहे.   

Read in English

Web Title: Opportunity from the ruling party for 12 governor-appointed seats; Loyal waiting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.