शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या माजी नौदल अधिकाऱ्यानं केली घोषणा; राज्यपालांच्या भेटीनंतर म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 04:37 PM2020-09-15T16:37:54+5:302020-09-15T16:46:22+5:30

माजी नौदल अधिकाऱ्यानं घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट; राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी

now im with bjp rss says Madan Sharma Who Was Beaten Up By Shivsena Workers | शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या माजी नौदल अधिकाऱ्यानं केली घोषणा; राज्यपालांच्या भेटीनंतर म्हणाले...

शिवसैनिकांनी मारहाण केलेल्या माजी नौदल अधिकाऱ्यानं केली घोषणा; राज्यपालांच्या भेटीनंतर म्हणाले...

Next

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दलचं एक व्यंगचित्र शेअर केल्यानं शिवसैनिकांनी नौदलाचे माजी अधिकारी मदन शर्मांना मारहाण केली.  यावरून विरोधकांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठवली. आज मदन शर्मांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हटवून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी त्यांनी केली. मी भाजपचा कार्यकर्ता असल्याचं म्हणत शिवसैनिकांनी मला मारहाण केली होती. आता मी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत आहे, असं शर्मांनी राज्यपालांनी सांगितलं.

माझ्यावर जीवेघणा हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांवर गंभीर गुन्हे दाखल केले गेले नाहीत, अशी व्यथा शर्मांनी राज्यपालांकडे मांडली. यानंतर राज्यपालांनी कठोर कारवाईचं आश्वासन दिल्याचं शर्मांनी सांगितलं. राज्यातलं सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी राज्यपालांकडे केली. यावर केंद्राशी बोलेन, असं उत्तर राज्यपालांनी दिल्याचं शर्मा म्हणाले.



'मी भाजप-संघाचा कार्यकर्ता असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी मला मारहाण केली. त्यामुळे आता मी भाजप-संघासोबत असल्याची घोषणा करतो', असं मदन शर्मांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं. शर्मांनी याआधीही ठाकरे सरकारवर थेट निशाणा साधला होता. कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल तर ठाकरेंनी त्वरित त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा, असं शर्मांनी म्हटलं होतं. 

मदन शर्मा यांना 'Y प्लस' सेक्युरिटी देण्यासाठी प्रयत्न करणार, आठवलेंनी घेतली भेट

शिवसेना कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाणीनंतर, उद्धव ठाकरेंच्या सर्व कार्यकर्त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणीही मदन शर्मा यांनी केली होती. मदन शर्मांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांची व्यथा मांडली. 'मी जखमी आहे. तणावात आहे. जे घडलं ते अतिशय दु:खद आहे. मला उद्धव ठाकरेंना एक गोष्ट अतिशय स्पष्ट शब्दांत सांगायची आहे. तुम्हाला कायदा-सुव्यवस्था राखता येत नसेल, तर राजीनामा द्या. ही जबाबदारी कोणाला द्यायची ते लोकांना ठरवू दे,' असं शर्मा म्हणाले. 'अशी घटना घडू नये. उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं देशाची माफी मागायला हवी,' अशी मागणी त्यांनी केली होती. 

"सरकारने विवेकबुद्धी गहाण ठेवलीय काय?, हे सरकार आहे की तिघाडीची ईस्ट इंडिया कंपनी?"

मदन शर्मा आणि कंगनासाठी आठवले सरसावले
मदन शर्मा आणि कंगना राणौत यांची बाजू घेत केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, कंगनावरील कारवाई ही दबावतंत्र असल्याचे सांगत संबंधित बीएमसी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही आठवलेंनी केली होती. विशेष, म्हणजे निवृत्त अधिकारी मदन शर्मा यांचीही आठवलेंनी घरी जाऊन भेट घेतली होती. कंगना राणौतनेही राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यानंतर, आता मदन शर्मा यांनी राज्यपालांची भेट घेत, आपले गाऱ्हाणे मांडले आहे.

फोटो फॉरवर्ड केला म्हणून निवृत्त नेव्ही अधिकाऱ्याला शिवसैनिकांची मारहाण

संरक्षणमंत्र्यांचा ठाकरे सरकारला स्पष्ट इशारा
नौदलातील माजी अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. मदन शर्मा यांना झालेल्या मारहाणीवरून संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. माजी सैनिकांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, अशा शब्दांत सिंह यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. सिंह यांनी मदन शर्मा यांच्याशी संवादही साधला आहे. 'माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. माजी सैनिकांवरील अशा प्रकारचे हल्ले निषेधार्ह असून ते कदापि खपवून घेतले जाणार नाहीत,' असं राजनाथ सिंह म्हणाले. 
 

Web Title: now im with bjp rss says Madan Sharma Who Was Beaten Up By Shivsena Workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.