राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे झाल्या ‘मिसेस डॉ. वाघ’; शरद पवारांनी दिले शुभाशीर्वाद

By प्रविण मरगळे | Published: February 21, 2021 12:56 PM2021-02-21T12:56:45+5:302021-02-21T12:57:00+5:30

नाशिकमधील प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण वाघ(Dr Pravin wagh) यांच्यासोबत आमदार सरोज अहिरे यांचा विवाह संपन्न झाला

NCP MLA Saroj Ahire and Dr. Marriage of Pravin Wagh in Nashik | राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे झाल्या ‘मिसेस डॉ. वाघ’; शरद पवारांनी दिले शुभाशीर्वाद

राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे झाल्या ‘मिसेस डॉ. वाघ’; शरद पवारांनी दिले शुभाशीर्वाद

googlenewsNext

नाशिक – देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी आमदार सरोज अहिरे(NCP Saroj Ahire) या विवाह बंधनात अडकल्या आहेत, नाशिकच्या अलास्का बॅक्वेंट हॉलमध्ये हा विवाह सोहळा संपन्न झाला, या विवाह सोहळ्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार(Sharad Pawar), नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ(Chhagan Bhujbal) यांच्यासह अनेक राष्ट्रवादी पदाधिकारी आणि मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

नाशिकमधील प्रसिद्ध दंतरोगतज्ज्ञ डॉ. प्रवीण वाघ(Dr Pravin wagh) यांच्यासोबत आमदार सरोज अहिरे यांचा विवाह संपन्न झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अतिशय मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत नाशिकच्या देवळाली मतदारसंघातून सरोज अहिरे विजयी झाल्या होत्या. इंदुमती आणि कै. माजी आमदार बाबूलाल सोमाजी अहिरे यांच्या त्या कन्या आहेत.

तर चोरडिया चोपडा नगर येथील दाताचे डॉक्टर प्रवीण वाघ हे कल्पना आणि रामदास हरी वाघ यांचे चिरंजीव आहेत. २० फेब्रुवारीला सरोज अहिरे आणि डॉ. प्रवीण वाघ यांचा साखरपुडा आणि हळदीचा कार्यक्रम झाला.

Web Title: NCP MLA Saroj Ahire and Dr. Marriage of Pravin Wagh in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.