ncp leader minister jayant patil clarifies on bjp pankaja munde joining ncp | पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?; जयंत पाटील म्हणाले...

पंकजा मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार?; जयंत पाटील म्हणाले...

ठळक मुद्देधनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरही दिली प्रतिक्रिया

सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाल्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र भाजपाच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा न दिल्यास आम्ही रस्त्यावर उतरु, असा इशारा भाजपा महिला मोर्चाच्या उमा खापरे यांनी दिला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप तसंच नवाब मलिक यांच्या जावयावर केलेली अटकेची कारवाई तसंच पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावर भाष्य केलं. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक बाबींवर भूमिका स्पष्ट केली. 

"कोणीही आरोप केला म्हणून राजीनामा दिला जाईल असं होणार नाही. पण पक्ष स्तरावर याची योग्य चर्चा केली जाईल, धनंजय मुंडेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. जर त्यांना ब्लॅकमेल केलं जात असेल आणि त्यांचा दोष नसेल तर राजीनाम्याच्या प्रश्नच उद्भवत नाही. पक्षांच्या अंतर्गत परिस्थितीचा नक्कीच आढावा घेतला जाईल. आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्र्यांशीही चर्ता करण्यात येईल आणि तत्थ्यांच्या आधारे निर्णय घेतला जाईल," असं पाटील म्हणाले.

दरम्यान, पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना पंकजा मुंडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशावर सुरु असलेल्या चर्चांसंबंधी प्रश्न विचारण्यात आला. “माझ्यापर्यंत तर तशी कोणतीही चर्चा आलेली नाही” सांगत जयंत पाटील यांनी या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं.
 

Web Title: ncp leader minister jayant patil clarifies on bjp pankaja munde joining ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.