त्यांचा एक आमदार तरी आहे का?; NDAची ऑफर देणाऱ्या आठवलेंना पवारांचं प्रत्युत्तर

By कुणाल गवाणकर | Published: September 29, 2020 04:08 PM2020-09-29T16:08:18+5:302020-09-29T16:09:01+5:30

शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं असं आवाहन रामदास आठवलेंनी केलं होतं

ncp chief sharad pawar hits back at central minister ramdas athawale | त्यांचा एक आमदार तरी आहे का?; NDAची ऑफर देणाऱ्या आठवलेंना पवारांचं प्रत्युत्तर

त्यांचा एक आमदार तरी आहे का?; NDAची ऑफर देणाऱ्या आठवलेंना पवारांचं प्रत्युत्तर

googlenewsNext

मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी एनडीएमध्ये यावं. त्यांना सत्तेत वाटा मिळेल, अशी थेट ऑफर देणाऱ्या केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचाशरद पवारांनी खरपूस समाचार घेतला. 'आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक तरी आमदार निवडून येतो का? आठवले अधूनमधून मार्गदर्शन करत असतात. त्यांना संसदेत आणि संसदेबाहेरही कोणी गांभीर्यानं घेत नाही,' असा टोला शरद पवारांनी लगावला.

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शरद पवारांनी केंद्र सरकारसोबत यावं, असं आवाहन रामदास आठवलेंनी काल केलं होतं. पवार सोबत आल्यास राष्ट्रवादीला सत्तेतही वाटा मिळेल, असं ते म्हणाले होते. राज्य सरकारमधील पक्षांमध्ये नाराजी आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रेड सिग्नल दिला. त्यामुळे राष्ट्रवादी नाराज होती. कोरोना काळात काही निर्णय घेण्यात आले. त्या प्रक्रियेत स्थान देण्यात आलं नाही, अशी काँग्रेसची तक्रार होती, याकडे आठवलेंनी लक्ष वेधलं होतं.

मुख्यमंत्रिपदावरून सुचवला २-३ चा फॉर्म्युला
रामदास आठवलेंनी शरद पवारांसोबतच उद्धव ठाकरेंनादेखील साद घातली. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपची युती तुटली. त्यावरही आठवलेंनी तोडगा सुचवला. 'उद्धव ठाकरे जवळपास एका वर्षापासून मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आणखी एखादं वर्ष मुख्यमंत्री राहावं. त्यानंतरची तीन वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहतील,' असा पर्याय आठवलेंनी सुचवला. 'भाजपसोबत आल्यावर सर्वाधिक फायदा शिवसेनेलाच होईल. त्यांना केंद्रातही एक-दोन मंत्रिपदं मिळतील,' असं आठवले म्हणाले होते.
 

Web Title: ncp chief sharad pawar hits back at central minister ramdas athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.