"...तेव्हा महाराज होते, भाजपाने आता भाई साहेब बनवले", ज्योतिरादित्य शिंदेंवर दिग्विजय सिंहांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 12:00 PM2021-03-19T12:00:59+5:302021-03-19T12:02:29+5:30

mp ex cm digvijay singh comments over jyotiraditya scindia : काँग्रेसकडून बेसली धरण भरण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. गुरुवारी दिग्विजय सिंह गोहद येथील या आंदोलनात सामील झाले होते.

mp ex cm digvijay singh comments over jyotiraditya scindia says bjp made him local boy | "...तेव्हा महाराज होते, भाजपाने आता भाई साहेब बनवले", ज्योतिरादित्य शिंदेंवर दिग्विजय सिंहांचा निशाणा

"...तेव्हा महाराज होते, भाजपाने आता भाई साहेब बनवले", ज्योतिरादित्य शिंदेंवर दिग्विजय सिंहांचा निशाणा

Next
ठळक मुद्देगोहदमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे. यावरून काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे.

भिंड : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांनी भाजपाचे राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसने इतकी वर्षे ज्यांना महाराज म्हणून मान दिला होता, त्यांना भाजपाने एका वर्षात भाई साहेब बनवले, असा शब्दांत दिग्विजय सिंह यांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर निशाणा साधला. गोहदच्या नवीन बसस्थानक मैदानातील जाहीर सभेत दिग्विजय सिंह  बोलत होते. (mp ex cm digvijay singh comments over jyotiraditya scindia says bjp made him local boy)

"राज्यसभेत ते (ज्योतिरादित्य शिंदे) नरेंद्र मोदी यांचे कौतुक करीत होते, तेव्हा मला वाईट वाटले. ज्यावेळी माझी संधी आली, तेव्हा मी म्हणालो- महाराज जय हो...तुम्ही आधी एक चांगल्या पद्धतीने काँग्रेसला समर्थन देते होते. तितकेच आता तुम्ही भाजपासाठी करत आहात", असे दिग्विजयसिंह यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री व लहारचे आमदार डॉ गोविंद सिंह, गोहदचे आमदार मेवाराम जाटव व अन्य काँग्रेसचे नेते उपस्थित होते.

पिण्याच्या पाण्यासाठी जनता त्रस्त
गोहदमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे. यावरून काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. गोहद येथील बेसली धरणातील पाणी पूर्णपणे कोरडे पडले आहे. यामुळे जनतेला पिण्याच्या पाण्याची चिंता करावी लागत आहे. काँग्रेसकडून बेसली धरण भरण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे. गुरुवारी दिग्विजय सिंह गोहद येथील या आंदोलनात सामील झाले होते.

(कडेकोट सुरक्षा, तरीही ज्योतिरादित्य शिंदेंच्या जयविलास पॅलेसमध्ये चोरी; ग्वाल्हेरमध्ये खळबळ)

नरेंद्र मोदी आणि शिवराज सिंह चौहान यांच्यावर हल्लाबोल
येथे दिग्विजय सिंह यांनी आंदोलक काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी बसस्थानकातील सभेलाही संबोधित केले. या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी गोहदच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला आणि प्रशासनाला हा प्रश्न लवकरच सोडवावा असे आवाहन केले. याचबरोबर दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यावरही हल्लाबोल केला.

Web Title: mp ex cm digvijay singh comments over jyotiraditya scindia says bjp made him local boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.