आई-बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याचं निलंबन करा; मनसेचं थेट गृहमंत्र्यांना पत्र

By प्रविण मरगळे | Published: January 7, 2021 01:20 PM2021-01-07T13:20:35+5:302021-01-07T13:21:56+5:30

या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन अर्वाच्च शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी राजेंद्र कांबळे यांना ताबडतोब निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी

MNS MLA Raju Patil Wrote letter to Home Minister Anil Deshmukh | आई-बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याचं निलंबन करा; मनसेचं थेट गृहमंत्र्यांना पत्र

आई-बहिणीवरून शिवीगाळ करणाऱ्या ‘त्या’ अधिकाऱ्याचं निलंबन करा; मनसेचं थेट गृहमंत्र्यांना पत्र

Next
ठळक मुद्देवास्तविक आंदोलनकर्त्यांना कार्यक्रम होईपर्यंत स्थानबद्ध करण्याची आवश्यकता होतीपोलीस अधिकाऱ्याच्या अशा वर्तवणुकीमुळे महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे.आंदोलकांना अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली

मुंबई – काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांकडून वसई-विरार येथे मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला, वसई-विरार महापालिका क्षेत्रातील समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयुक्त भेट देत नाहीत, म्हणून मनसेच्या २ कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या परिवहन सेवेच्या लोकार्पण सोहळ्यात घोषणाबाजी करण्यात आली. गेल्या ६ महिन्यापासून पत्र व्यवहार आणि संपर्क साधूनही वसई-विरार पालिका आयुक्त वेळ देत नसल्याने आंदोलन केल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं.

मात्र या घोषणा देणाऱ्या मनसेच्या २ कार्यकर्त्यांना तिथे बंदोबस्ताला हजर असणाऱ्या पोलीस निरीक्षण राजेंद्र कांबळे यांनी मारहाण आणि आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याचा आरोप मनसेकडून केला जात आहे, त्याबाबत काही व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. त्यानंतर मनसेचे आमदार राजू पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना पत्र लिहून संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करा अशी मागणी केली आहे.

या पत्रात लिहिलंय की, महाराष्ट्रात दरदिवशी विविष विषयांवर ठिकठिकाणी अनेक संघटना, पक्षांकडून शेकडो आंदोलन होत असतात, अशी आंदोलन हाताळण्याची एक पद्धत आहे व नियम आहेत, परंतु वसई-विरारमध्ये घडलेला प्रकार कोणत्याही राजकीय पक्षाच्या, संघटनेच्या किंवा राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीत घडणे योग्य नाही, पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी हाताळलेले आंदोलन महाराष्ट्राच्या गृह खात्याला शोभा देणारे नसून अत्यंत घृणास्पद आहे असा आरोप आमदार राजू पाटील यांनी केला.

तसेच आंदोलकांना अतिशय अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली, त्याची ध्वनिफित इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियावर फिरत आहे. वास्तविक आंदोलनकर्त्यांना कार्यक्रम होईपर्यंत स्थानबद्ध करण्याची आवश्यकता होती, परंतु राजेंद्र कांबळे यांनी तसे न करता कार्यकर्त्यांना शिवीगाळ करून मारहाण केलेली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या अशा वर्तवणुकीमुळे महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण पोलीस दल बदनाम होत आहे असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

त्यामुळे या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन अर्वाच्च शिवीगाळ आणि मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी राजेंद्र कांबळे यांना ताबडतोब निलंबित करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी जेणेकरून महाराष्ट्र पोलीस दल आणि गृहखात्याबद्दल सकारात्मक संदेश जनतेमध्ये जाईल अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.

काय घडली घटना?

वसई-विरार पालिका प्रशासनाने मंगळवारी परिवहन बसेसचे उद्घाटन, लोकार्पण सोहळा आयोजित केला होता. या कार्यक्रमाला नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व इतर नेते मंडळी हजर असताना, मनसैनिक आक्रमक झाले. त्यातील मनसेच्या दोघा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत राडा केला. पोलीस आणि शिवसैनिकांनी दोघा मनसे कार्यकर्त्यांना या वेळी चोप देत, कार्यक्रमातून बाहेर काढले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही मनसे कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नेले. परिवहन सेवेवरून बविआ-शिवसेना आमने-सामने उभी असताना, मध्येच मनसेने राडा केल्याने कार्यक्रमाला गालबोट लागले.

Web Title: MNS MLA Raju Patil Wrote letter to Home Minister Anil Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.