Maharashtra Gram Panchayat Election Results: राज्याला २ मुख्यमंत्री देणाऱ्या गावात भाजप सुस्साट; बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी भुईसपाट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 07:53 PM2021-01-18T19:53:38+5:302021-01-18T19:53:59+5:30

Maharashtra Gram Panchayat Election Results: राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भाजपकडून खिंडार; भाजपचं शत प्रतिशत यश

Maharashtra Gram Panchayat Election Results ncp losses bastion from bjp in yavatmal | Maharashtra Gram Panchayat Election Results: राज्याला २ मुख्यमंत्री देणाऱ्या गावात भाजप सुस्साट; बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी भुईसपाट

Maharashtra Gram Panchayat Election Results: राज्याला २ मुख्यमंत्री देणाऱ्या गावात भाजप सुस्साट; बालेकिल्ल्यात राष्ट्रवादी भुईसपाट

Next

यवतमाळ: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत यवतमाळमध्ये भारतीय जनता पक्षानं मोठी मुसंडी मारली आहे. काँग्रेसच्या दोन दिग्गज माजी मुख्यमंत्र्यांच्या गावात भाजपनं एकतर्फी विजय मिळवला आहे. यवतमाळमधल्या पुसद तालुक्यातील गहुली ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता आली आहे. गहुली हे वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक या दोन दिवंगत मुख्यमंत्र्यांचं गाव असल्यानं हा विजय भाजपसाठी अतिशय महत्त्वाचा आहे.

गहुली ग्रामपंचायतीत बराच काळ राष्ट्रवादीची सत्ता होती. पण यंदा भाजपनं राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात जबरदस्त धडक दिली. विधान परिषदेतील आमदार निलय नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली गहुलीत भाजपनं सरशी साधली आहे. १९४९ पासून गहुलीत बिनविरोध निवडणूक झाल्या. मात्र यंदा भाजपनं राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला धक्का दिला. भाजपनं ७ पैकी ७ जागा जिंकत राष्ट्रवादीला धक्का दिला. भाजपच्या विजयात निलय नाईक यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीच्या इंद्रनिल नाईक यांचं आव्हान होतं. इंद्रनिल हे निलय यांचे चुलत बंधू आहेत. हे दोघेही माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या घराण्यातील आहेत.

कोण आहेत निलय नाईक?
निलय नाईक यांनी ऑगस्ट २०१७ मध्ये राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला. जुलै २०१८ मध्ये भाजपनं त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. निलय नाईक यांनी २००९ मध्ये अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. मात्र त्यावेळी त्यांचा पराभव झाला. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. नाईक परिवार राष्ट्रवादीशी एकनिष्ठ मानला जात होता. दिवंगत माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचं हे घराणं आहे.

Web Title: Maharashtra Gram Panchayat Election Results ncp losses bastion from bjp in yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.