Chirag Paswan: काकांनी डाव साधला! चिराग पासवान गेटबाहेर हॉर्न वाजवत बसले; 20 मिनिटांनी आत घेतले पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 12:39 PM2021-06-14T12:39:57+5:302021-06-14T12:56:01+5:30

Gate closed for Chirag Paswan of Pashupati Kumar Paras home in Delhi: बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. दिवंगत नेते रामविलास पासवान यांचा भाऊ मुख्यमंत्री नितीश कुमारांना जाऊन मिळाला असून यामुळे लोकजनशक्ती पार्टीमध्ये मोठा गोंधळ सुरु झाला आहे.

LJP Chirag Paswan sat outside the gate blowing the horn; Pashupati Kumar Paras open first gate | Chirag Paswan: काकांनी डाव साधला! चिराग पासवान गेटबाहेर हॉर्न वाजवत बसले; 20 मिनिटांनी आत घेतले पण...

Chirag Paswan: काकांनी डाव साधला! चिराग पासवान गेटबाहेर हॉर्न वाजवत बसले; 20 मिनिटांनी आत घेतले पण...

Next

दिल्ली - बिहारच्याराजकारणात मोठी उलथापालथ घडली आहे. दिवंगत नेते रामविलास पासवान यांचा भाऊ मुख्यमंत्री नितीश कुमारांना जाऊन मिळाला असून यामुळे लोकजनशक्ती पार्टीमध्ये मोठा गोंधळ सुरु झाला आहे. चिराग पासवान या घडामोडीत एकटे पडले असून सहापैकी पाच खासदार काका पशुपती पारस यांच्या वळचणीला गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या काकांची समजूत घालण्यासाठी चिराग पासवान त्यांच्या घरी गेले आहेत. मात्र, गेटच उघडत नसल्याने त्यांना कारमध्येच हॉर्न वाजवत बसावे लागले होते. (Delhi: LJP national president Chirag Paswan arrives at the residence of party MP and uncle Pashupati Kumar Paras, to meet him.)

पासवानांच्या पक्षात उभी फूट, स्वकीयांनीच केला चिराग यांचा गेम, जाणून घ्या कोण आहेत पशुपती पारस




अखेर चिराग पासवान यांना 20 मिनिटांनी गेट उघडण्यात आले. हे बाहेरील गेट होते. अद्याप आतील गेट पासवान यांच्यासाठी उघडण्यात न आल्याने ते बाहेरच खोळंबले आहेत. तसेच पारसदेखील घरी नसल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे पुतण्याला काकांची वाट पाहून घरी जावे लागण्याची शक्यता आहे. 

पशुपती कुमार पारस हे लोकजनशक्ती पार्टीचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष दिवंगत रामविलास पासवान यांचे भाऊ आणि पक्षाचे सध्याचे अध्यक्ष चिराग पासवान यांचे काका आहेत. पशुपती पारस हे अलौली मतदारसंघातून पाचवेळी आमदार म्हणून निवडून आळे आहेत. त्यांनी १९७७ मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकली होती. तेव्हापासून ते वेगवेगळ्या पक्षांमधून प्रवास केल्यानंतर आता लोकजनशक्ती पार्टीकडून निवडणूक लढवत होते. त्यांनी बिहार सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिले आहे. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी हाजीपूर मतदारसंघातून विजय मिळवत लोकसभेत प्रवेश केला होता.  

खासदार पशुपती पारस यांच्या नेतृत्वामध्ये पक्षातील अन्य चार खासदारही पक्षापासून वेगळे होण्याची तयारी करत आहेत. हे सर्व खासदार जेडीयूच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. पशुपती पारस यांचे नितीश कुमार यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे ते जेडीयूमध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहेत. मात्र पशुपती पारस यांनी बंडखोरी करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे. 
 

Web Title: LJP Chirag Paswan sat outside the gate blowing the horn; Pashupati Kumar Paras open first gate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.