मोठी घडामोड! विधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; लवकरच निर्णय होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2021 02:30 PM2021-06-15T14:30:23+5:302021-06-15T14:36:21+5:30

राज्यपालाने विधानपरिषदेच्या १२ सदस्यांची यादी स्वतःकडे ठेवली आहे. अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती

The list of 12 names of the Legislative Council is with the Governor only; A decision will made soon | मोठी घडामोड! विधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; लवकरच निर्णय होणार

मोठी घडामोड! विधानपरिषदेच्या ‘त्या’ १२ नावांची यादी अखेर सापडली; लवकरच निर्णय होणार

googlenewsNext
ठळक मुद्देसुनावणीत अनिल गलगली यांनी यादी उपलब्ध नसल्यास मग नेमकी कोणाकडे उपलब्ध आहे, असा सवाल केला.१९ मे २०२१ रोजी राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची यादी जन माहिती अधिकारी ( प्रशासन) यांच्या कार्यालयात उपलब्ध नाही असं सांगण्यात आलं होतं. १५ जून रोजी राजभवन सचिवालयात याबाबत अनिल गलगली यांनी दिलेल्या आव्हान अपिलावर सुनावणी झाली

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून राज्यपाल नियुक्त १२ जागांवरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत आहेत. यातच इतके महिने उलटले तरीही अद्याप राज्यपालांनी १२ जणांच्या नावाची घोषणा न केल्यानं विधानपरिषदेच्या त्या जागा रिक्त आहेत. अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने विधानपरिषद सदस्य नेमणूक करण्यासाठी ज्या १२ लोकांची नावे पारित करुन राज्यपालाकडे मंजुरीसाठी पाठविली होती ती यादी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस दिली होती.

मंगळवारी १५ जून रोजी राजभवन सचिवालयात याबाबत अनिल गलगली यांनी दिलेल्या आव्हान अपिलावर झालेल्या सुनावणीत ती यादी राज्यपालाने स्वतःकडे ठेवली असल्याचे सांगण्यात आले. आता राज्यपालांने निर्णय घेतल्यावरच माहिती मिळेल असं सांगण्यात आलं आहे. अनिल गलगली यांनी संभ्रमित करणाऱ्या माहिती बाबत प्रथम अपील दाखल केले असून आज मंगळवारी १५ जून रोजी राज्यपालाच्या उप सचिव असलेल्या प्राची जांभेकर यांनी सुनावणी घेतली.

सुनावणीत अनिल गलगली यांनी यादी उपलब्ध नसल्यास मग नेमकी कोणाकडे उपलब्ध आहे, असा सवाल केला. राज्यपालांकडे यादी सहित संपूर्ण नस्ती आहे आणि निर्णय झाल्यावर माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे प्राची जांभेकर यांनी सांगितले. त्या पुढे म्हणाल्या की तसेच सद्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माहिती दयावी किंवा नाही? याबाबत सल्लामसलत केली जाईल. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल सचिवालयाकडे २२ एप्रिल २०२१ रोजी माहिती विचारली होती की, मुख्यमंत्री अथवा मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नामीत विधानपरिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपाल महोदयांकडे सादर केलेली यादी देण्यात यावी. तसेच मुख्यमंत्री महोदय/ मुख्यमंत्री सचिवालयातर्फे राज्यपाल नामीत विधानपरिषदेवर सदस्य नेमणुकीबाबत राज्यपाल महोदयांकडे सादर केलेल्या प्रस्तावाची सद्यस्थितीची माहिती देण्यात यावी.

अनिल गलगली यांच्या अर्जावर १९ मे २०२१ रोजी राज्यपाल सचिवालयाचे अवर सचिव जयराज चौधरी यांनी उत्तर देत कळविले की, राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्यांची यादी जन माहिती अधिकारी ( प्रशासन) यांच्या कार्यालयात उपलब्ध नसल्याने, आपणांस उपलब्ध करुन देता येत नाही. यावरून सत्ताधाऱ्यांनी बराच गोंधळ घातला होता. राजभवनातून यादी कुठे गहाळ झाली असा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु आता ती यादी राज्यपालांकडेच असल्याचं स्पष्ट झालं आहे.

Web Title: The list of 12 names of the Legislative Council is with the Governor only; A decision will made soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.