आमचं ठरलंय! त्याला काय हुतंय?; काँग्रेस आमदाराचा कोल्हापुरी शैलीत ‘कोरोनाला तटवायचं’ इरादा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 01:57 PM2020-08-18T13:57:14+5:302020-08-18T13:57:57+5:30

कोल्हापूरात वाढणारा कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी असं आवाहन काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला केलं आहे.

Kolhapur Congress MLA Ruturaj Patil Appeal to People about awareness of Corona | आमचं ठरलंय! त्याला काय हुतंय?; काँग्रेस आमदाराचा कोल्हापुरी शैलीत ‘कोरोनाला तटवायचं’ इरादा

आमचं ठरलंय! त्याला काय हुतंय?; काँग्रेस आमदाराचा कोल्हापुरी शैलीत ‘कोरोनाला तटवायचं’ इरादा

googlenewsNext

मुंबई – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. शहरी भागात पसरणाऱ्या कोरोनाने हळूहळू ग्रामीण भागातही पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूरातही आतापर्यंत १४ हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ७ हजाराहून जास्त रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत ३८२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोल्हापूरात वाढणारा कोरोना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत आता कोल्हापूरच्या जनतेनेही कोविड योद्धा म्हणून स्वत:ची जबाबदारी पार पाडावी असं आवाहन काँग्रेस आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला केलं आहे. सुरुवातीला शहरी भागात पसरणारा कोरोना, आपल्या गावात, गल्लीत, दारात येऊन पोहचला आहे. सुरुवातील शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस आपल्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. आता कम्युनिटी स्प्रेड होण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे आपण स्वत:ची काळजी घ्यायला हवी, आजही मार्केट, दुकाने, बेकरी अशा अनेक ठिकाणी गर्दी असल्याचं चित्र आहे.

सोशल डिस्टेंसिंग आणि, मास्क घालणे सॅनिटायझरचा वापरही करत नाही, बऱ्याचदा मित्रांसोबत एकत्र बसणे, जेवायला एकत्र बसतो, गल्लीच्या कोपऱ्यावर मित्रमंडळी तासनतास गप्पा मारताना दिसतात. महिला मंडळीही दारात एकत्र बसून चर्चा करत असतात. त्याला काय हुतंय? ओपन ग्राऊंडवर खेळायचं तिथेही गर्दी, वाढदिवसाला मित्रमंडळी गर्दी करुन सेलिब्रेशन करतात, हातात हात देऊन टाळी देतो, सुट्टी आहे वेळ आहे म्हणून पार्ट्या केल्या जातात. मग त्याला काय हुतंय? कोरोना किती दिवस आहे माहिती नाही असं म्हणत लग्नाचा मुहुर्त काढून नियमांचे उल्लंघन करुन पै पाहुणे बोलवतो, खेळण्यासाठी आयुष्य आहे पण आता थोडं थांबू शकत नाही का? असं विचारलं आहे.

पावसाळा आहे म्हटल्यावर अनेक पर्यटनस्थळी जाता, रंकाळा, राधानगरी येथे लोक जमा होतात. मज्जा करायला गर्दी करतो, हे टाळता येणार नाही का? आम्ही सगळे घरचे आहोत असं म्हणत पाहुणे मंडळी, मित्रमंडळी नेहमीप्रमाणे ये जा करतो, हे सगळं आपण करत आलोय, कोरोना गेल्यानंतर पुढे करत राहू. पण आता काळ कठीण आहे. आपल्या जीवावर बेतलं आहे. त्यासाठी स्वत:ची, कुटुंबाची काळजी घ्या, लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटा, हे कोल्हापूर आहे, आता ठरलं की ठरलं, त्यामुळे पुन्हा एकदा आमचं ठरलंय, कोरोनाला तटवायचं असं म्हणत ऋतुराज पाटील यांनी व्हिडीओच्या माध्यमातून कोल्हापूरवासियांना आवाहन केले आहे.  

Web Title: Kolhapur Congress MLA Ruturaj Patil Appeal to People about awareness of Corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.