"सक्रिय राजकारण अन् निवडणूक नियम माहीत नसतील तर शांत बसा", 'त्या' चुकीवरून भाजपाचा प्रियंका गांधींना सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 12:00 PM2021-04-01T12:00:05+5:302021-04-01T12:03:33+5:30

Congress Priyanka Gandhi And BJP Jamyang Tsering Namgyal Kerala Assembly Election 2021 :

Kerala Assembly Election 2021 congress priyanka gandhi mistake in tweet bjp jamyang tsering namgyal suggest Silent | "सक्रिय राजकारण अन् निवडणूक नियम माहीत नसतील तर शांत बसा", 'त्या' चुकीवरून भाजपाचा प्रियंका गांधींना सणसणीत टोला

"सक्रिय राजकारण अन् निवडणूक नियम माहीत नसतील तर शांत बसा", 'त्या' चुकीवरून भाजपाचा प्रियंका गांधींना सणसणीत टोला

Next

नवी दिल्ली - काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi ) यांची एका ट्विटमुळे फजिती झाली आहे. अनेकांनी त्यांच्यावर यामुळे निशाणा साधला आहे. भाजपाच्या एका खासदाराने प्रियंका गांधींची चूक सुधारली असून त्यांना चांगलंच सुनावलं आहे. सोशल मीडियावर लोकांनी प्रियंका गांधींना ट्रोल केलं. भाजपा नेता आणि लडाखचे खासदार जमयांग सेरिंग नामग्याल (Jamyang Tsering Namgyal) यांनी प्रियंका यांना निवडणूक नियम माहीत नसतील गप्प बसावं, असा सल्ला दिला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. 

प्रियंका गांधी यांनी "केरळमध्ये आमचे 50 टक्के उमेदवार 20 ते 40 वयोगटातले असल्याचा खूप अभिमान वाटतोय. आमच्या वरिष्ठ नेतृत्वाचा अनुभव आणि ज्ञानामुळे ते संयुक्तपणे एक शक्तीशाली ताकद बनतात. मला आशा आहे की, केरळच्या जनतेची सेवा करण्याची संधी त्यांना मिळेल, जेणेकरुन युडीएफचा दृष्टीकोन समजेल" असं आपल्या ट्विट केलं होतं. आपल्या ट्विटमध्ये प्रियंका गांधींनी उमेदवारांचं किमान वय 20 वर्ष लिहिलं, त्यावरुन सोशल मीडियावर त्यांना ट्रोल करण्यात येत आहे. 

भाजपा नेते जमयांग सेरिंग नामग्याल यांनी प्रियंका गांधींना यावरून सुनावलं आहे. "जर तुम्हाला सक्रिय राजकारण आणि निवडणूक नियम माहीत नसतील तर शांत बसणं एक चांगला पर्याय आहे" असा सणसणीत टोला त्यांनी प्रियंका गांधी यांना लगावला आहे. तसेच "भारतात निवडणूक लढण्याची किमान वयोमर्यादा 25 वर्ष आहे, आता तुमच्या 20 ते 25 वयोगटातील उमेदवारांचं काय होणार?" असंही खासदार नामग्याल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

"केरळची लोकं हेच खरं सोनं पण मुख्यमंत्री सोन्याच्या तस्करीत आणि विदेशी कंपन्यांना कंत्राट देण्यात व्यस्त"

केरळमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे राजकारण तापलं आहे. सत्तेवर असलेल्या एलडीएफ म्हणजेच लेफ्ट डेमोक्रॅटीक फ्रण्टवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी केरळमधील कोल्लमच्या करुनागप्पलीत निवडणक प्रचारादरम्यान राज्यातील पिनरई विजयन (Pinarayi Vijayan) सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. मुख्यमंत्री विजयन यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात उघडकीस आलेल्या सोने तस्करीच्या प्रकरणावरून प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला आहे. तसेच केरळचे मुख्यमंत्री सोन्याच्या तस्करीत व्यस्त असल्याचं म्हणत हल्लाबोल केला आहे. 

"केरळची लोकं हेच राज्याचं खरं सोनं आहेत. पण मुख्यमंत्री सोन्याची तस्करी करण्यात आणि विदेशी कंपन्यांना मासेमारीचे कंत्राट देण्यात व्यस्त आहेत. मुख्यमंत्री कॉर्पोरेट जाहीरनाम्याचं पालन करत असून, कॉर्पोरेट कंपन्यांच्या मालकांना राज्याची संपत्ती विकण्याचाच त्यांचा अजेंडा आहे" अशी घणाघाती टीका प्रियंका गांधी यांनी केली आहे. तसेच "तुमच्यासमोर तीन प्रकारच्या राजकारणाचे पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे शोषण, घोटाळे आणि हिंसाचार करणाऱ्या सीपीएमचं राजकारण. दुसरा द्वेषाचं आणि विभाजन करणारं भाजपाचं राजकारण. तर तिसरा पर्याय केरळच्या भविष्याची दृष्टी असलेलं काँग्रेसचं राजकारण. सीपीएमची मागील पाच वर्ष घोटाळे, दडपशाही आणि पक्षपातीपणाची होती" असं देखील प्रियंका यांनी म्हटलं आहे. 

Web Title: Kerala Assembly Election 2021 congress priyanka gandhi mistake in tweet bjp jamyang tsering namgyal suggest Silent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.