एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचं हा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न; मनसेनं फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 04:06 PM2020-09-04T16:06:35+5:302020-09-04T16:09:53+5:30

कंगनावर त्वरित मानसोपचारतज्त्रांचे उपचार सुरु करण्यात यावेत आणि मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मनसेने मागणी केली आहे.

Kangana disgusting attempt to gather the crowd at airport and keep herself in the spotlight; MNS | एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचं हा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न; मनसेनं फटकारलं

एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचं हा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न; मनसेनं फटकारलं

Next
ठळक मुद्देया विकृतीमागे कुणाचं डोकं आहे हेही आम्हाला नीट माहिती आहे.दररोज सोशल मीडियावर टुकार पोस्ट टाकून खळबळ माजवायची ही एक विकृतीचकुणाला किती महत्त्व द्यायचं हे राजसाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे

मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिच्याविषयी संताप वाढत चालला आहे. कंगनाने मी मुंबईत येतेय, कुणाच्या बापात हिंमत आहे तर मला थांबवा असं थेट आव्हान केल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करत कंगनाचं एअरपोर्टवर मनसे स्टाईल स्वागत करायला मनसैनिक खूप उत्सुक आहेत असं कोणाला वाटत असेलही, पण कुणाला किती महत्त्व द्यायचं हे राजसाहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

याबाबत अमेय खोपकर म्हणाले की, दररोज सोशल मीडियावर टुकार पोस्ट टाकून खळबळ माजवायची ही एक विकृतीच आहे आणि या विकृतीमागे कुणाचं डोकं आहे हेही आम्हाला नीट माहिती आहे. एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचं असा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न आहे. म्हणून आमच्या २ प्रमुख मागण्या आहेत. त्या म्हणजे कंगनावर त्वरित मानसोपचारतज्त्रांचे उपचार सुरु करण्यात यावेत आणि मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मनसेने मागणी केली आहे.

तसेच यापूर्वी मनसेने कंगनाला दमही दिला आहे. माझ्या मुंबई पोलिसांबद्दल जजमेंटल होऊन कुणीही पंगा घेऊ नये. मुंबईत आज आमच्या बहिणी मध्यरात्रीसुद्धा कामावरुन घरी बिनधास्तपणे जातात, याला कारण आहे मुंबई पोलीस. आज मुंबईत मी सुरक्षित आहे ते केवळ मुंबई पोलिसांमुळेच. कामाचा कितीही ताण असो, पगार अनियमित असो, मनुष्यबळ कमी असो, ऊन असो-पाऊस असो..कशाचीही पर्वा न करता हिंमतीने पाय रोवून उभे राहतात ते मुंबई पोलीस असं मनसेने सांगितले आहे. ज्या कुणाला माझ्या या मुंबई पोलिसांची भीती वाटते त्यांनी खुशाल आपापल्या राज्यात जाऊन असुरक्षित राहावं. याला धमकी समजा किंवा सल्ला...पण मुंबई पोलिसांबद्दल काहीही बरळलेलं मीच काय कोणताही सच्चा मुंबईकर सहन करणार नाही असं मनसेचे अमेय खोपकर यांनी अभिनेत्री कंगना राणौतला बजावलं आहे.

शिवसेनेची कंगनाला धमकी

कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना  पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे असं शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी संजय राऊत यांनीही कंगनावर निशाणा साधला आहे. मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही, याचबरोबर, मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत. त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर हल्लाबोल केला.

काय आहे प्रकरण?

अभिनेत्री कंगना राणौतनं संजय राऊत यांनी आपल्याला धमकी दिल्याचा दावा केला होता. 'मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस, असं म्हणत मला राऊत यांनी धमकी दिली असं ती म्हणाली. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तान व्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?' असा सवाल कंगनानं ट्विटच्या माध्यमातून उपस्थित केला होता.

Web Title: Kangana disgusting attempt to gather the crowd at airport and keep herself in the spotlight; MNS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.