औरंगाबादच्या नामांतरावरून कलगीतुरा; काँग्रेस म्हणतेय 'दुय्यम' तर मनसेचे 'संयम'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 07:17 AM2021-01-03T07:17:56+5:302021-01-03T07:31:13+5:30

Aurangabad Politics: औरंगाबादच्या नामकरणावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. एका शहराच्या नावावरून असे मतभेद होत नसतात. भाजपला उकळ्या फुटण्याचे कारण नाही. भाजपचे गेली पाच वर्षे केंद्रात सरकार होते. अलाहाबादचे प्रयागराज केले त्याचवेळी संभाजीनगर का नाही केले, असा सवाल खा. संजय राऊत यांनी केला.

Kalgitura from Aurangabad rename; Bjp, Mns shaking hands | औरंगाबादच्या नामांतरावरून कलगीतुरा; काँग्रेस म्हणतेय 'दुय्यम' तर मनसेचे 'संयम'

औरंगाबादच्या नामांतरावरून कलगीतुरा; काँग्रेस म्हणतेय 'दुय्यम' तर मनसेचे 'संयम'

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई / औरंगाबाद : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याच्या मुद्द्यावर राजकीय कलगीतुरा सुरूच आहे. 
सध्यातरी या नामांतराच्या मुद्द्याला अग्रक्रम नसून, तो दुय्यम आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांवर काँग्रेस नेत्यांचे अधिक प्रेम आणि श्रद्धा असणार, याची मला खात्री आहे, असे सांगून भाजपचे कान टोचले. तर २६ जानेवारीपूर्वी हे नामांतर केले नाही, तर आंदोलन करणार असल्याची भूमिका मनसेने घेतली. 

औरंगाबादच्या नामकरणावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. एका शहराच्या नावावरून असे मतभेद होत नसतात. भाजपला उकळ्या फुटण्याचे कारण नाही. भाजपचे गेली पाच वर्षे केंद्रात सरकार होते. अलाहाबादचे प्रयागराज केले त्याचवेळी संभाजीनगर का नाही केले, असा सवाल खा. संजय राऊत यांनी केला. संभाजीनगर विमानतळाचे नाव छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ करावे, असा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. केंद्रात भाजपची सत्ता असूनही त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
केवळ अग्रलेख लिहून काही होणार नाही, राज्यात तुमचे सरकार आहे. आता औरंगाबादचे संभाजीनगर करून दाखवा. आम्ही २६ जानेवारीपर्यंत वाट पाहू. नाहीतर, आंदोलन करू, असा इशारा मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे.


नामांतराचा प्रस्ताव दुय्यम : अशोक चव्हाण
औरंगाबादचे नाव बदलून ते संभाजीनगर करण्याबाबत सरकारकडे कुठलाच प्रस्ताव नाही. सध्यातरी या नामांतराच्या मुद्द्याला अग्रक्रम नसून, तो दुय्यम असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
 तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे वेगवेगळे मतप्रवाह हे राहणारच; परंतु सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम ठरलेला आहे. त्यानुसार हे सरकार चालविले जात आहे, असे सांगून सर्व आलबेल असल्याचे चव्हाण यांनी सूचित केले. 

 

अहमदनगरचेही नाव ‘अंबिकानगर’ करा
शिर्डी : औरंगाबादप्रमाणेच अहमदनगरचे नावही ‘अंबिकानगर’ करावे, अशी मागणी शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांनी केली आहे. 
मराठा ठोक क्रांती मोर्चाचे आंदोलन
औरंगाबाद नामांतराच्या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शनिवारी मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये जोरदार आंदोलन केले. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. 

Web Title: Kalgitura from Aurangabad rename; Bjp, Mns shaking hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.