"कोरोना येणार हे अल्लाला २०११ मध्येच समजलं होतं", जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाने वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2021 01:34 PM2021-02-21T13:34:23+5:302021-02-21T13:41:37+5:30

Jitendra Awhad News : राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत असतानाच राज्य सरकारमधील मंत्री आणि ठाण्यातील कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हान यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Jitendra Awhad said, "Allah knew that Corona would come in 2020" | "कोरोना येणार हे अल्लाला २०११ मध्येच समजलं होतं", जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाने वाद

"कोरोना येणार हे अल्लाला २०११ मध्येच समजलं होतं", जितेंद्र आव्हाड यांच्या विधानाने वाद

Next
ठळक मुद्देअल्लाला २०११ मध्येच समजले होतेत्यामुळेच मुंब्य्रात कब्रस्थानासाठी जमीन प्राप्त झाली आणि २०१९ मध्ये कब्रस्थान बांधून पूर्ण झाले आव्हाड यांच्या या विधानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे

(मुंब्रा) ठाणे - गेल्या वर्षभरापासून राज्यात सुरू असलेल्या कोरोना विषाणूच्या थैमानामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. त्यातच गेल्या काही दिवसांत कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढू लागल्याने चिंतेत भर पडली आहेत. (Coronavirus in Maharashtra) यादरम्यान, राज्य सरकारमधील मंत्री आणि ठाण्यातील कळवा-मुंब्रा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. (Jitendra Awhad said, "Allah knew that Corona would come in 2020" )

जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्य्रामध्ये एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या विधानामुळे हा वाद निर्माण झाला आहे. कोरोना येणार आहे हे अल्लाला २०११ मध्येच समजले होते. त्यामुळेच मुंब्य्रात कब्रस्थानासाठी जमीन प्राप्त झाली आणि २०१९ मध्ये कब्रस्थान बांधून पूर्ण झाले असे आव्हाड यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले. आव्हाड यांच्या या विधानाचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

आव्हाड यावेळी म्हणाले की, कोरोनाच्या काळात जर आपल्याकडे हे कब्रस्थान नसते तर शहराची काय परिस्थिती असती याची कल्पनाही करवत नाही. याचा विचार अल्लाने आधीच २०११ करून ठेवला होता की २०२० मध्ये कोरोना येणार आहे. आणि हा कोरोना येण्यापूर्वी येथे कब्रस्थान बनले पाहिजे. म्हणूनच येथे कब्रस्थानसाठी २०११ मध्येच जमीन मिळाली आणि २०१९ मध्ये कब्रस्थानचे काम पूर्ण झाले. 

दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Web Title: Jitendra Awhad said, "Allah knew that Corona would come in 2020"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.