"नरेंद्र मोदी PM आहेत पण नितीश कुमारांमध्येही पंतप्रधान होण्याची क्षमता" 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 10:34 AM2021-08-02T10:34:10+5:302021-08-02T10:42:59+5:30

Nitish Kumar And Narendra Modi : उपेंद्र कुशवाहा यांनी एक विधान केलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार पंतप्रधान पदाचे मटेरियल आहेत असं म्हटलं आहे.

jdu upendra kushwaha says Narendra Modi PM but bihar cm nitish kumar PM material | "नरेंद्र मोदी PM आहेत पण नितीश कुमारांमध्येही पंतप्रधान होण्याची क्षमता" 

"नरेंद्र मोदी PM आहेत पण नितीश कुमारांमध्येही पंतप्रधान होण्याची क्षमता" 

Next

नवी दिल्ली - बिहारमधील संयुक्त जनता दलाच्या (JDU) संसदीय पक्षाचे नेते उपेंद्र कुशवाहा (Upendra Kushwaha) यांनी एक विधान केलं आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) पंतप्रधान पदाचे मटेरियल आहेत असं म्हटलं आहे. तसेच पंतप्रधान होण्यासाठी आवश्यक असलेली क्षमता त्यांच्यात आहेत. पण आपण आता एनडीएत आहोत आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीच (Narendra Modi) आहेत. ते चांगलं कामही करत आहेत असं उपेंद्र कुशवाहा यांनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. पण त्यांच्याशिवाय अनेक जणांमध्ये पंतप्रधान होण्याची क्षमता आहे. त्यात नितीश कुमारही आहेत. यात कुठलेही दुमत नाही. त्यांना पीएम मटेरियल म्हटले गेले पाहिजे, असं देखील कुशवाहा यांनी सांगितलं. 

जातीनिहाय जणगणना झालीच पाहिजे. आता केली गेली नाही, तर आणखी काही वर्षांचा विलंब होईल. पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यात आला आहे. केंद्र सरकारने जातीनिहाय जनगणना केली पाहिजे. असं न झाल्यास मोठं नुकसान होईल असं कुशवाहा म्हणाले. जनगणना मुद्यावर विरोधकांनी पाठिंबा दिल्यास त्यांचं स्वागतच आहे. राष्ट्रीय जनता दलासह इतर पक्षांनी समर्थन दिलं तर त्याला हरकत घेण्याचं काही कारण नाही. वातावरण निर्मिती करून हा मुद्दा बनवला पाहिजे. सामान्य जनगणनेसोबतच सरकारने जातीनिहाय जनगणनाही करावी. हे खूप गरजेचं आहे, अशी मागणी उपेंद्र कुशवाहा यांनी केली. जातीनिहाय जनगणनेची मागणी काँग्रेससह, राष्ट्रीय जनता दलाकडून करण्यात येत आहे. 

सात महिन्यांतच नितीशकुमारांनी आपला वारसदार बदलला; खासदार ललन सिंह जदयूचे नवे अध्यक्ष

बिहार निव़डणूक संपताच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजकीय वारसदाराची घोषणा केली होती. तसे करणे त्यांना भागही होते. परंतू सात महिन्यांतच नितीश कुमारांनी पुन्हा दुसऱ्या वारदाराची निवड केली आहे. आज झालेल्या जेडीयूच्या कार्यकारिणीच्या बैठकीत खासदार ललन सिंह यांना नवा राष्ट्रीय अध्यक्ष बनविण्यात आले आहे. ललन सिंह हे नितीश कुमार यांचे विश्वासू साथीदार आहेत. ते आरसीपी सिंह यांची जागा घेणार आहे. नितीश कुमार यांनी डिसेंबर 2020 च्या अखेरीस आरसीपी सिंह यांना पक्षाचा अध्यक्ष केले होते. नितीश कुमार नेहमीच अचानक आणि धक्कादायक निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. 

गेल्या निवडणुकीत राजदसोबत निवडणूक लढवत लालूपुत्रांला उपमुख्यमंत्री केले होते. मात्र, ते डोईजड होऊ लागताच अचानक भाजपाची साथ पकडत पुन्हा सत्ता स्थापन केली होती. यावेळी देखील त्यांनी भाजपासोबतच निवडणूक लढविली होती. मात्र, ही निवडणूक त्यांच्यासाठी खूप कठीण गेली. हरण्याची चिन्हे दिसू लागताच नितीश कुमारांनी थेट निवृत्तीचेच का़र्ड खेळले. आता त्यांच्यासमोर उत्तराधिकारी शोधण्याचे आव्हान होते. कारण सातव्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर नितीश कुमारांना विरोधकांसह भाजप, स्वपक्षियांकडूनही विचारणा होणार होती. म्हणून त्यांनी आरसीपी सिंह यांची निवड केली होती. परंतू पुन्हा अध्यक्ष बदलण्यात आला आहे. 

 

Web Title: jdu upendra kushwaha says Narendra Modi PM but bihar cm nitish kumar PM material

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.