एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस? बीएचआर घोटाळ्याची पोलखोल भोवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2020 09:37 PM2020-12-25T21:37:00+5:302020-12-25T21:40:57+5:30

Eknath Khadse ED News: एकनाथ खडसे यांनी भाईचंद हिरांचद रायसोनी संस्थेतील 1100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार प्रकरणी जिल्ह्यातील दिग्गजच अधिक असून संस्थेची मालमत्ता कवडीमोल भावात घेतलेल्या आमदार, खासदार, माजी मंत्री याची पण माहिती असून ती देणार असल्याचेही म्हटले होते.

I will speak when got notice from the ED; Eknath Khadse to face BHR scam | एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस? बीएचआर घोटाळ्याची पोलखोल भोवणार

एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस? बीएचआर घोटाळ्याची पोलखोल भोवणार

Next

बीएचआर संस्थेतील घोटाळ्याची कागदपत्रे देणाऱे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने नोटीस पाठविली आहे. आधीच गेली सहा वर्षे खडसे भूखंड घोटाळ्यावरून वनवासात होते. आता त्यांनी माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. आता हेच राजकीय वितुष्ट खडसेंना पुन्हा महागात पडण्याची चिन्हे आहेत. 


ईडीने 30 डिसेंबरला हजर राहण्याची नोटीस खडसेंना पाठविल्याचे वृत्त आहे. यावर एकनाथ खडसे यांनी अद्याप नोटीस मिळाली नाही, नोटीस मिळाल्यावर बोलेन, अशी प्रतिक्रिया दिली आहे. आता ही नोटीस नेमकी कशासंदर्भात आहे? देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या क्लिनचिटचा पुण्यातील भूखंड घोटाळा की आणखी कशाबाबत ते लवकरच स्पष्ट होणार आहे. 


एकनाथ खडसे यांनी भाईचंद हिरांचद रायसोनी संस्थेतील 1100 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार प्रकरणी जिल्ह्यातील दिग्गजच अधिक असून संस्थेची मालमत्ता कवडीमोल भावात घेतलेल्या आमदार, खासदार, माजी मंत्री याची पण माहिती असून ती देणार असल्याचेही खडसे म्हणाले. बीएचआर संस्थेतील अपहार, गुंतवणूकदारांची देणी न देणे, संस्थेच्या मालमत्तेची कवडीमोल भावाने विक्री करणे व पुणे येथे दाखल गुन्ह्या संदर्भात जळगावात आर्थिक गुन्हे शाखेकडून  चौकशी सुरू आहे‌.


या पूर्वीच्या राज्य सरकारने कारवाई थांबवली
दोन वर्षांपूर्वी तक्रारी केल्या तरी या पूर्वीच्या राज्य सरकारने कारवाई थांबवून ठेवण्याचा आरोपदेखील खडसे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता केला. या गैरव्यवहार प्रकरणी प्रथम राज्य सरकारकडे आपण तक्रारी केल्या होत्या. मात्र बीएचआर संस्था मल्टीस्टेट क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी कायदा २००२ प्रमाणे या संस्थेवर कारवाईचे अधिकार केंद्र सरकारला असल्याने राज्याचे सहकार आयुक्त यावर कारवाई करू शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी हा चौकशी अहवाल सरकारला पाठविला होता. त्यानंतरही राज्य सरकारने चौकशी थांबवून ठेवली होती असे खडसे यांचे म्हणणे आहे.
 

ईडीची वाट न पाहता सीडी लावा...

‘ तुम्ही ईडी लावाल तर आम्ही सीडी लावू’ म्हणताय. मग जरुर सीडी बाहेर काढा. कशाची वाट पाहताय? असे आव्हान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नोव्हेंबरमध्ये एकनाथ खडसेंना दिले होते.  तुम्ही ईडी लावाल तर आम्ही तुमची सीडी दाखवू असे आव्हान खडसेंनी फडणवीसांना दिले होते. यावर फडणवीस म्हणाले, इडीने आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर रेड टाकली असेल तर त्यांच्याकडे निश्चित काहीतरी माहिती असेल. त्याशिवाय ते रेड टाकत नाही. मला याबद्दल फारशी माहिती नाही. पण ज्यांनी चूक केली नाही त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. चूक झाली असेल तर एजन्सी कारवाई करेल. आमच्या सरकारच्या काळातील वीज मंडळाच्या कारभाराची चौकशी करणार असाल तर खुशाल करा. 

Web Title: I will speak when got notice from the ED; Eknath Khadse to face BHR scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.