जेव्हा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई खासदार छत्रपती उदयनराजेंना भररस्त्यात मुजरा करतात तेव्हा...

By प्रविण मरगळे | Published: March 15, 2021 05:42 PM2021-03-15T17:42:44+5:302021-03-15T17:43:22+5:30

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई एका लग्न समारंभासाठी कोल्हापूरला जात होते, त्यावेळी योगायोगाने खासदार उदयनराजे भोसले हेदेखील गोव्याच्या दिशेने चालले होते

Home Minister of State Shambhuraj Desai meets MP Chhatrapati UdayanRaje bhosale at kolhapur highway | जेव्हा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई खासदार छत्रपती उदयनराजेंना भररस्त्यात मुजरा करतात तेव्हा...

जेव्हा गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई खासदार छत्रपती उदयनराजेंना भररस्त्यात मुजरा करतात तेव्हा...

googlenewsNext

सातारा – भारतीय जनता पार्टीचे राज्यसभेचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्यातील मैत्रीचे किस्से नेहमी ऐकले असतील, उदयनराजे आणि शंभुराज देसाई हे वेगवेगळ्या पक्षात असले तरी दोघांनीही नेहमी एकमेकांचा आदर ठेवला आहे, वेळोवेळी अडचणीच्या काळात एकमेकांना मदतही केलेली आहे. सध्या या दोघांचा एक फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.(Home Minister of State Shambhuraj Desai Meets MP Udayanraje Bhosale)

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई एका लग्न समारंभासाठी कोल्हापूरला जात होते, त्यावेळी योगायोगाने खासदार उदयनराजे भोसले हेदेखील गोव्याच्या दिशेने चालले होते, तेव्हा वाटेत शंभुराज देसाई यांच्या गाड्यांचा ताफा दिसल्यानंतर उदयनराजेंनी त्यांची गाडीही ताफ्यासोबत घेतली, त्यानंतर कोल्हापूरनजीक शिरूळ एमआयडीसी महामार्गावर उदयनराजेंना पाहून शंभुराज देसाईंनी त्यांची गाडी थांबवली. या दोन्ही नेत्यांची अचानक घडलेली भेट सगळ्यांसाठी आश्चर्यकारक होती, यावेळी शंभुराज देसाई यांनी नेहमीच्या आदराप्रमाणे उदयनराजेंना भररस्त्यात मुजरा केला, तेव्हा हा क्षण फोटोत कैद झाला.

जिल्ह्याच्या राजकारणात शंभुराज देसाई आणि उदयनराजे भोसले नेहमी एकमेकांना पुरक अशी भूमिका घेत असतात. छत्रपती घराण्याबद्दल शंभुराज देसाई यांच्या मनात प्रचंड आदर आहे, त्याच पार्श्वभूमीवर शंभुराजेंनी उदयनराजेंना मुजरा करत छत्रपती घराण्याचा आदर राखला. काही महिन्यांपूर्वी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्यालाही शंभुराज देसाई यांनी चांगलेच सुनावले होते.

छत्रपती घराण्याचे १३ वे वंशज असलेले उदयनराजे यांच्याबद्दल कोणी काही बोललं तर ते खपवून घेणार नाही, साताऱ्याच्या गादीचा मान ठेवलाच पाहिजे, सातारकर म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे, छत्रपती घराण्यावर टीका निंदणीय आहे असं विधान शंभुराज देसाई यांनी केले होते. तर अलीकडेच मराठा आरक्षणावरून उदयनराजेंनी विष प्राशन करू असं विधान केले होते, त्यावर शंभुराज देसाई म्हणाले होते की, उदयनराजेंनी टोकाची भूमिका घेऊ नये, राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत कुठेही कमी पडत नाही, उदयनराजेंची समजूत काढणार असल्याचं देसाईंनी सांगितले होते. अनेकदा या दोन्ही नेत्यांची भेट सातारमध्ये निवासस्थानी होत असते, परंतु आज थेट कोल्हापूरच्या महामार्गावर दोन्ही नेते वाटेतच भेटल्याचं दिसून आलं.
 

Web Title: Home Minister of State Shambhuraj Desai meets MP Chhatrapati UdayanRaje bhosale at kolhapur highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.