"राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2020 10:37 AM2020-12-09T10:37:58+5:302020-12-09T10:42:31+5:30

BJP And Congress Rahul Gandhi Over Farmers Protest : केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यावरुन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

gujarat cm vijay rupani asks if rahul gandhi knows difference between coriander and fenugreek | "राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का?"

"राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का?"

Next

नवी दिल्ली - गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा. अशी मागणी शेतकरी करीत आहेत. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांच्याविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा देण्यावरुन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना रुपाणी यांनी सणसणीत टोला लगावला आहे. "राहुल गांधींना कोथिंबीर आणि मेथी मधला फरक माहिती आहे का?" असा सवाल विचारला आहे. 

मेहसाणा येथील एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये बोलताना विजय रूपाणी यांनी काँग्रेस आणि गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस ज्या सुधारणांची वकीली करायची आज त्यालाच काँग्रेसकडून विरोध करुन राजकारण करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच "मी राहुल गांधींना विचारु इच्छितो, तुम्हाला कोथिंबीर आणि मेथीमधला फरक तरी माहितीय का?" असं रूपाणी यांनी निशाणा साधला आहे. रूपाणी हे मेहसाणा येथे 287 कोटी रुपये खर्च करुन उभारण्यात आलेले नर्मदा पेयजल योजनेच्या भूमिपुजनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.

भाजपाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत लगावला सणसणीत टोला 

"2019 च्या निवडणुकांच्या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने आम्ही सत्तेत आल्यास एपीएमसी कायद्यामध्ये बदल करु आणि शेतकऱ्यांना त्यांच्या ठरलेल्या बाजारपेठांच्या बाहेर शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देऊ. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हाच बदल केला आहे तर काँग्रेस याचा विरोध का करत आहे?" असं रूपाणी यांनी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधींनी एका काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी एपीएमसीमधून भाज्या आणि फळांना हटवण्यात यावं. असं केल्यास त्यांच्या किंमती कमी होतील, असं मत व्यक्त केलं होतं. आता शेतकऱ्यांना सशक्त करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे तर काँग्रेस त्याचा विरोध करत आहे. काँग्रेसने अशी भूमिका का घेतली आहे याचं उत्तर लोकांना हवं आहे असंही रूपाणी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शेतकऱ्यांच्या भारत बंद आंदोलनाच्या समर्थनार्थ केलेल्या विधानावर भाजपाने पलटवार केला आहे. भाजपाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधत सणसणीत टोला लगावला आहे.  राहुल गांधी आणि त्यांचे संपूर्ण कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात आणि त्यांना तसेच अशोक यांना शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही असं राजस्थान भाजपा प्रदेशाध्यक्ष सतीश पूनिया यांनी म्हटलं आहे."मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शेतकऱ्यांच्या भारत बंदचे समर्थन केलं आहे. मात्र यावेळी भारत बंद नाही, तर भारत खुला होण्याची आवश्यकता आहे, असे पूनिया म्हणाले. 

"राहुल गांधी आणि कुटुंब पार्टटाईम राजकारण करतात, शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही"

जगात खुल्या मनाने, खुला भारत नवा भारत आणि प्रगतीच्या मार्गावर चालावा यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे. राहुल गांधी यांनी हे शेतकऱ्यांचे समर्थक असल्याचं म्हटलं आहे आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाची पार्श्वभूमी तयार केल्याचं विधान गेहलोत यांनी केलं आहे." "गेहलोत यांचे हे विधान निराधार आहे. राहुल गांधी आणि त्यांचे कुटुंब पार्टटाईम राजकारण करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांशी काहीही देणं घेणं नाही. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही शेतकऱ्यांचं काहीही पडलेलं नाही" असं भाजपाच्या सतीश पूनिया यांनी म्हटलं आहे. तसेच राजस्थानात शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जर काँग्रेसला खरंच शेतकऱ्यांबाबत तळमळ असेल तर त्यांनी प्रथम राजस्थानातील शेतकऱ्यांची दखल घ्यावी असं देखील म्हटलं आहे. 

Web Title: gujarat cm vijay rupani asks if rahul gandhi knows difference between coriander and fenugreek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.