Governor's letter to CM like a political leader, angry Sharad Pawar complains to PM | राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची भाषा राजकीय नेत्यासारखी, संतप्त शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे केली तक्रार

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची भाषा राजकीय नेत्यासारखी, संतप्त शरद पवार यांनी पंतप्रधानांकडे केली तक्रार

ठळक मुद्देराज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी दिली संतप्त प्रतिक्रिया राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना पाठलेल्या पत्राची भाषा ही कुठल्याही घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीसारखी नाही तर राजकीय नेत्यासारखीशरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यपालांबाबत केली तक्रार

मुंबई - कोरोना काळात बंद असलेली मंदिरे उघडण्यासाठी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून आज राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यपालांनी या पत्रामधून मुख्यमंत्र्यांना हिंदुत्वाची आठवण करून दिल्याने या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपा आमने-सामने आले आहेत. दरम्यान, राज्यपालांनी पाठवलेल्या या पत्राबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्र्याना पाठलेल्या पत्राची भाषा ही कुठल्याही घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीसारखी नाही तर राजकीय नेत्यासारखी आहे असा टोला पवार यांनी लगावला आहे. तसेच शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून राज्यपालांबाबत तक्रार केली आहे.

या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये शरद पवार म्हणाले की, माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्राची भाषा ही दुर्दैवाने राजकीय पक्षाच्या नेत्यासारखी आहे. हे पत्र प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून माझ्यासमोर आले आहे. या पत्रामधून राज्यपालांनी कोरोना काळात बंद असलेली मंदिरे सामान्य जनतेसाठी उघडण्याची सूचना केली होती. दरम्यान, आपल्या राज्यघटनेच्या प्रस्तावनेत ह्यधर्मनिरपेक्षह्ण हा शब्द जोडला गेला आहे. ज्याचा अर्थ सरकारसाठी सर्व धर्म समान आहेत आणि त्यांचे रक्षण होते, असा होतो. म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसणाऱ्या व्यक्तीने संविधानामधील अशा आचारांनुसार वागले पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिलं होतं असं उत्तर

आपले दिनांक १२।१०।२० रोजीचे इंग्रजीमध्ये पाठवलेले प्रार्थनास्थळे उघडण्याबद्दलचे पत्र मिळाले. याबद्दल सरकार जरूर विचार करत आहे. जनतेच्या भावना, श्रद्धा जपताना त्यांच्या जीवाची काळजी घेणे हे आमच्या सरकारचे प्रथम कर्तव्य आहे, आणि म्हणूनच करोनाशी लढताना जसा एकदम लॉकडाऊन करणे चुकीचे तसेच तो एकदम उठवणेही अयोग्यच. कोरोनासोबत अथवा त्याचा धोका टाळून जगणे हे अंगवळणी पडावे म्हणून सद्ध्या राज्यात ह्यमाझे कुटूंब, माझी जबाबदारी ह्य हि मोहीम राबवली जात असल्याची आठवण उद्धव ठाकरेंनी पत्रातून करुन दिलीय. 
महोदय, आपण या पत्रात माझ्या हिंदुत्वाचा जो उल्लेख केला आहे तो योग्यच आहे, मात्र माझ्या हिंदुत्वाला आपल्या प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. तसेच ते कोणाकडून शिकण्याचीही मला गरज नाही. माझ्या राज्याला अथवा माझ्या राज्याच्या राजधानीला पाकव्याप्त काश्मिर म्हणणाऱ्याचें हसत खेळत घरात स्वागत करणे हे माझ्या हिंदुत्वात बसत नाही.  केवळ धर्मस्थळे उघडणे म्हणजे हिंदुत्व आणि न उघडणे म्हणजे  असे आपले म्हणणे आहे का? मग आपण राज्यपालपदाची शपथ  ज्या घटनेनुसार घेतलीत त्या घटनेचा महत्वाचा गाभा सेक्युलॅरिझम आहे तो आपल्याला मान्य नाही का?  मला या संकटाशी लढताना काही येतात का? असाही प्रश्न आपणांस पडला आहे, आपल्याला अशा गोष्टींचा अनुभव असेल. मात्र, मी एवढा थोर नाही . इतर राज्यांत, देशात बरे वाईट काय घडते आहे ते बघत माझ्या महाराष्ट्रात चांगले कसे करता येईल ते करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना खरमरीत पत्र लिहिलं आहे.

Web Title: Governor's letter to CM like a political leader, angry Sharad Pawar complains to PM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.