बिहारींना मोफत कोरोना लस! आचारसंहितेचे उल्लंघन नाही; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

By हेमंत बावकर | Published: October 31, 2020 05:51 PM2020-10-31T17:51:36+5:302020-10-31T17:52:05+5:30

Bihar Election 2020: गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या न्याय योजनेविरोधात निवडणूक आयोगाने असेच उत्तर दिले होते. या योजनेत 25 कोटी लोकांना प्रति महिना कमीतकमी उत्पन्न 6000 रुपये किंवा वर्षाला 72000 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. 

Free corona vaccine for Biharis! Not a breach of the Code of Conduct; Election Commission | बिहारींना मोफत कोरोना लस! आचारसंहितेचे उल्लंघन नाही; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

बिहारींना मोफत कोरोना लस! आचारसंहितेचे उल्लंघन नाही; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

Next

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या जाहीरनाम्यात जिंकल्यास कोरोना लस मोफत देणार असल्याचे आश्वासन दिले होते. यावर विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यावर निवडणूक आयोगाने क्लीन चिट दिली आहे. 


निवडणूक जाहीरनाम्यात बिहारच्या लोकांना मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन देणे म्हणजे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन नसल्याचे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. आरटीआय कायकर्ते साकेत गोखले यांनी याचिका दाखल केली होती. त्याला आयोगाने उत्तर दिले आहे. गोखले यांनी अशा प्रकारच्या घोषणा करणे म्हणजे केंद्र सरकारच्या शक्तींचे उल्लंघन करून मतदारांना फसविण्याचा प्रयत्न असल्याचे याचिकेत म्हटले आहे. कारण अद्याप कोरोना लसीबाबत कोणतीही रणनीति ठरलेली नाही. 


गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या न्याय योजनेविरोधात निवडणूक आयोगाने असेच उत्तर दिले होते. या योजनेत 25 कोटी लोकांना प्रति महिना कमीतकमी उत्पन्न 6000 रुपये किंवा वर्षाला 72000 रुपये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. 


काय आहे भाजपाचा जाहीरनामा?
या जाहीरनाम्यात भाजपाने ११ मोठे संकल्प केले आणि सत्तेत आल्यानंतर अनेक आश्वासने पूर्ण करण्याचा दावा केला. “भाजपा है तो भरोसा है’ ५ सूत्रे, एक लक्ष्य, ११ संकल्प' यासह भाजपाने नवीन नाराही दिला आहे. पाटण्यात जाहीरनामा जाहीर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण, भाजप नेते भूपेंद्र यादव आणि इतर नेत्यांनी पत्रकार परिषदेत भाषण केले. निर्मला सीतारामन यांनी माध्यमांना सांगितले की, कोरोना लस उपलब्ध होत नाही तोपर्यंत मास्क हाच उपाय आहे. परंतु ही लस येताच ती मोठ्या प्रमाणात भारतात तयार होईल. ही लस बिहारच्या लोकांना मोफत दिली जाईल असं आश्वासन भाजपानं दिलं आहे.
भाजपाच्या जाहिरनाम्यातील ११ मुख्य संकल्प

१. बिहारच्या प्रत्येक रहिवाशांना कोरोनाची लस मोफत देणार.

२. वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर तांत्रिक शिक्षण हिंदी भाषेत उपलब्ध करुन देणे.

३. एका वर्षात संपूर्ण राज्यात तीन लाख नवीन शिक्षकांची भरती होईल.

४. पुढील पिढीसाठी आयटी हब येथे पाच वर्षात पाच लाख रोजगार निर्मिती.

५. एक कोटी महिला स्वावलंबी बनवणार.

६. आरोग्य विभागात एक लाख लोकांना नोकर्‍या मिळतील तसेच २०२४ पर्यंत दरभंगा एम्स सुरू करणार

७. धान आणि गहू नंतर डाळींची खरेदीही एमएसपी दराने केली जाईल.

८. २०२२ पर्यंत ३० लाख लोकांना पक्के घर देण्याचं आश्वासन.

९. २ वर्षात १५ नवीन प्रक्रिया उद्योग स्थापन करण्याचे वचन.

१०. गोड्या पाण्यातील माशांचे उत्पादन वाढवणार

११. शेतकरी उत्पादक संघटनेची पुरवठा साखळी तयार करणार, ज्यामुळे १० लाख रोजगार निर्माण होतील.

Web Title: Free corona vaccine for Biharis! Not a breach of the Code of Conduct; Election Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.