काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा यांना लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 04:06 AM2020-08-25T04:06:34+5:302020-08-25T04:06:55+5:30

खा. सोनिया गांधी यांनी अडचणीच्या काळात पक्षाला उभारी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए-१ आणि युपीए-२ च्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देणारे, देशाला विकासाची नवी दिशा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले.

Factionalism in Congress at the forefront; Targets Prithviraj Chavan, Mukul Wasnik, Milind Deora | काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा यांना लक्ष्य

काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर; पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा यांना लक्ष्य

googlenewsNext

मुंबई : काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून दिल्लीत वादंग सुरू झाला असताना प्रदेश काँग्रेस नेत्यांमधील मतभेद उघड झाले आहेत. राहुल गांधी यांनीच अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली, तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा यांना मुंबईत महाराष्ट्रात फिरणे मुश्कील करू, असा, इशारा पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिला आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह मुकुल वासनिक आणि मिलिंद देवरा यांच्या ‘त्या’ पत्रावर स्वाक्षऱ्या असल्यामुळे राहुल गांधी यांच्याशी निष्ठा दाखवण्याची चालून आलेली संधी अनेकांनी सोडली नाही. पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी गांधी घराण्यावर आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणे हे अत्यंत निंदाजनक आहे. तीनही नेत्यांनी ताबडतोब माफी मागावी, अन्यथा त्यांना महाराष्ट्रात करणे मुश्किल करू, असा इशारा दिला. तर भारताची एकता, अखंडता तसेच प्रगतीमध्ये नेहरू-गांधी कुटुंबाने दिलेले योगदान अपूर्व आहे. देश व काँग्रेस पक्ष संघटित ठेवण्यासाठी पुढील काळातही त्यांच्या नेतृत्वाची गरज आहे. पक्षाला बांधून ठेवण्याची क्षमता केवळ गांधी कुटुंबाकडे आहे. इतिहासात हे अनेकदा सिद्ध झाले आहे. या वास्तवाची जाणिव ठेवूनच खा. राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद स्वीकारावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.

खा. सोनिया गांधी यांनी अडचणीच्या काळात पक्षाला उभारी दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली युपीए-१ आणि युपीए-२ च्या केंद्र सरकारच्या कार्यकाळात सर्वसामान्यांना न्याय देणारे, देशाला विकासाची नवी दिशा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय झाले. कोणतीही महत्वाकांक्षा न बाळगता कर्तव्यभावनेतून त्यांनी देश व काँग्रेसची सेवा केली. त्यामुळे पक्षाच्या पुढील वाटचालीबाबत त्या योग्य व सर्वमान्य निर्णय घेतील, याचा पूर्ण विश्वास आहे असेही अशोक चव्हाण यांनी सांगितले.

...तर सरकारमधून बाहेर पडू - वडेट्टीवार
काँग्रेस पक्ष हा लोकशाही मूल्यांचं प्रतीक आहे. म्हणूनच जे पत्र सोनिया गांधींना लिहिलं आहे, त्याकडे सध्याच्या नेतृत्वाला विरोध म्हणून पाहिले जाऊ नये. राहुल गांधींनी आम्हाला सरकारमधून बाहेर पडण्यास सांगितले, तर आम्ही तत्काळ बाहेर पडू. एक दिवसही सरकारमध्ये राहणार नाही, असे मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले.

Web Title: Factionalism in Congress at the forefront; Targets Prithviraj Chavan, Mukul Wasnik, Milind Deora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.