एकनाथ शिंदे यांनीच ठाण्याचे पैसे दिले नाहीत - नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 11:22 PM2021-02-16T23:22:52+5:302021-02-16T23:23:43+5:30

Narayan Rane : महापालिकेच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून निधी येणे शिल्लक असल्याचा उल्लेख आहे. याकडे राणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे.

Eknath Shinde did not pay for Thane - Narayan Rane | एकनाथ शिंदे यांनीच ठाण्याचे पैसे दिले नाहीत - नारायण राणे

एकनाथ शिंदे यांनीच ठाण्याचे पैसे दिले नाहीत - नारायण राणे

Next

ठाणे : ठाणे शहराला राज्य सरकारकडून येणेबाकी असलेले पैसे नगर विकासमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांच्याकडेच आहेत. त्यांनी ठाणेकरांचे पैसे अडविले आहेत. ते जर त्यांनी दिले तर ठाण्याचा विकास होईल, अशा शब्दांत खा. नारायण राणे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली. महापालिका निवडणुकीत भाजपची स्वबळावर सत्ता येईल, असा दावाही राणे यांनी केला.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारकडून निधी येणे शिल्लक असल्याचा उल्लेख आहे. याकडे राणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते आहे. महापालिकांना त्यांच्या हक्काचा निधी देणे ही त्यांचीच जबाबदारी आहे. शिंदे यांनीच ठाणेकरांचा निधी अडविला आहे. त्यामुळे ते पैसे त्यांच्याकडेच असल्याचा टोला लगाविला. ५०० चौरस फुटांच्या घरांना अद्याप करमाफी दिलेली नाही. अगोदर वचने देतात आणि तोंडाला पाने पुसण्याचे काम शिवसेना करत असल्याचे राणे म्हणाले. ठाण्यात अनधिकृत बांधकामांवर कुणाचा अंकुश राहिलेला नाही. अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी तक्रार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातात. याचाच अर्थ अधिकारी आणि शिवसेनेची मिलीभगत आहे. मात्र, धमक्यांना आम्ही घाबरत नसल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले.  

Web Title: Eknath Shinde did not pay for Thane - Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.